फुंडे महाविद्यालयात एड्स विषयी जनजागृती व मार्गदर्शन.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 13 ऑगस्ट आझादी अमृत महोत्सव हर घर झेंडा अभियानाचे औचित्य साधून व आंतररष्ट्रीय युवा दिनानिमत इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण, वीर वाजेकर महाविद्यालय एन एस एस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने फुंडे येथे एच आय व्ही एड्स जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी डॉ. बी एम काळेल वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय उरण यांच्या मार्गदर्शनाने व वीर वाजेकर महाविद्यालय फूंडे एनएसएस विभागाचे प्रा. सी. डी. धिंदले यांच्या सहाकार्याने आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला.रेड रिबन क्लब अंतर्गत एन एस एस व इतर उपस्थित सर्व तरुण तरुणींना एच.आय.व्ही.एड्स या रोगाविषयी जनजागृतीपर व्याख्यान देण्यात आले.महादेव पवार एड्स समुपदेशक यांनी या रोगाविषयी असणारे समज गैरसमज एच आय व्हीं होण्याचे कारणे, याविषयी मुलांशी संवाद साधला.विवाहपूर्व एड्स चाचणी करणे किती महत्त्वाचे आहे.याविषयी मंगेश पाटील प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ.पी.जी.पवार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सी.डी.धिंदळे कार्यक्रम अधिकारी रा.से.यो. यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.श्रीकांत गोतपागर यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार डॉ.रत्नमाला जावळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here