उरण पोलीस ठाण्यातर्फे राष्ट्रीय ध्वजाचे वाटप

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 10 ऑगस्ट
दि. 10/08/2022 रोजी सकाळी 13.30 वा. ते 14.00 वा. दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त उरण पोलीस ठाणेत महिला दक्षता समिती व लायन्स क्लबच्या सदस्यांना हर घर झेंड्याच्या उपक्रम बाबत चर्चा करून सूचना दिल्या. तसेच महिला सदस्यांना राष्ट्रीय ध्वजाचे वाटप करण्यात आले. दि.13-15 ऑगस्ट दरम्यान ‘‘हर घर झेंडा” संदर्भात जनजागृती करण्यात बाबत माहिती देण्यात आली.

सदर कार्यक्रमास उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील , पो.नि. सुहास चव्हाण, गुन्हे, सपोनी गवते, सपोनी गिजे, सपोनी पंडित पाटील तसेच सीमा घरत, नयना ठाकूर, नयना पाटील, मोनिका पाटील, सामिया बुबेरे, कविता म्हात्रे आदी महिला दक्षता कमिटींचे महिला सदस्य उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here