आमदार चषक २०२२ तायक्वांडो भव्य जिल्हा स्तरीय सर्धेत उरण तायक्वांडो ॲकेडमीच्या खेळाडूंची सुवर्णमय कामगिरी

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि १० ऑगस्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसा निमित्त “जाणीव एक सामाजिक संस्था पनवेल व रायगड तायक्वांडो असोसिएशन आयोजित विरूपाक्ष मंगल कार्यालय पनवेल येथे संपन्न झालेल्या आमदार चषक २०२२ तायक्वांडो भव्य जिल्हा स्तरीय स्पर्धेत उरण तायक्वांडो ॲकेडमीच्या खेळाडूंनी दैदिप्यमान यश संपादन करून उरण तालुक्याचे नाव मोठे केले आहे.

आमदार चषक २०२२ तायक्वांडो भव्य जिल्हा स्तरीय स्पर्धेतील यशवंत झालेले स्पर्धक पुढीलप्रमाणे :-

गोल्ड मेडल विजेते :-
१) कु. दर्शन नाईक २) दुर्वा वाजे
३)तनिष पाटील.

सिल्व्हर मेडल विजेते.:-
१) कु. मानसी शर्मा २) तन्वी शेळके. ३) गौरव शर्मा ४) अभिषेक चव्हाण.

ब्रान्झ मेडल विजेते :-
१)कु. प्रतिक राठोड २) स्वप्नील घरत ३) ओमकार मयेकर
४) अंकुर वाजे.

या सर्व पदक विजेत्यांचे मास्टर तेजस मारूती पाटील आणि प्रथमेश पाटील व उरण वासियांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्वं विजेत्यांचे त्यांनी करून दाखविलेल्या कामगिरीचे तेजस मारूती पाटील आणि प्रथमेश पाटील व उरणचे नागरिक यांच्या कडून वेगवेगळ्या स्तरातुन कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here