आई इन्फ्रा कंपनीचे पार्टनर ब्रह्मानंद पाटील बिजनेस एक्सलंट अवॉर्डने सन्मानित.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 7 ऑगस्ट
रविवार दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी नाशिक येथे मोठ्या दिमाखात पार पडलेल्या रिसेल डॉट इन या उद्योग समूहाच्या वतीने महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रात यशस्वी गरुडभरारी घेणाऱ्या उद्योजकांचा बिजनेस एक्सलंट अवार्ड हा पुरस्कार प्रार्थना बेहेरे यांच्या शुभहस्ते ब्रह्मानंद पाटील यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. हा यशस्वी उद्योजक द्रोणागिरी नवी मुंबई येथे 2009 सालापासून बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. कंपनीचे मालक सुप्रसिद्ध उद्योजक नरसु पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. आई इन्फ्रा कंपनीचे ते पार्टनर आहेत. याचबरोबर आई इन्फ्रा कंपनीने द्रोणागिरी नवी मुंबई, निपाणी कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये आपला बांधकाम व्यवसाय पसरविलेला आहे. यासोबत ब्रह्मानंद पाटील हे साई प्रोपॅक कंपनीचे पार्टनर सुद्धा आहेत. तसेच साई संस्थेचे सेक्रेटरी आहेत. अतिशय लहान वयामध्ये कामाचा विस्तार यशस्वीपणे करत असल्यामुळे त्यांना हा बिजनेस एक्सलंट अवॉर्ड देण्यात आला. यामुळे द्रोणागिरी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यात असणाऱ्या त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झालेला आहे.सर्वच स्तरातून ब्रह्मनंद पाटील यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here