नागपंचमीच्या दिवशीच सापाला दिले जीवदान

 

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 3 जुलै
दिघोडे येथील नारायण पाटील यांच्या मळ्यातील जाळ्यात अडकलेल्या सापाची सुटका महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांनी केली. सदर साप हा धामण जातीचा असून तो 7 फूट लांब होता. धामण हा बिनविषारी साप आहे.धामण साप बिनविषारी असला तरी त्याला कोणताही त्रास होऊ नये. इजा होऊ नये म्हणून त्या सापाला कोणतेही इजा न पोहोचविता राजू मुंबईकर यांनी जाळ्यात अडकलेल्या सापाची सुटका करून जंगलात सोडले. निसर्गमित्र, पर्यावरण प्रेमी राजू मुंबईकर यांनी यापूर्वीही अनेक विषारी, बिनविषारी साप, नाग पकडून त्यांना जीवदान दिले आहे.शाळा कॉलेज मध्ये जाऊन ते साप, नाग यांच्याविषयीं व्याख्याने आयोजित करून सापा विषयी ते गैरसमज दूर करत असतात.पर्यावरणचे संरक्षण ते नेहमी करतात. ते केअर ऑफ नेचर या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. नागपंचमी या सणा निमित्त त्यांनी साप वाचवा, पर्यावरण वाचवा असे सांगत सापांना मारू नका. त्यांना सुरक्षित स्थळी जंगलात किंवा निसर्गात सोडा. साप कोणालाही त्रास देत नाहीत. त्यामुळे त्यांना कोणीही इजा पोहोचवू नये. सजीव सृष्टी धोक्यात आल्याने प्रत्येकाने सजीव सृष्टी वाचविण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here