नज़ीरशेठ अपार्टमेंट समोरील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण. ग्रामस्थांनी मानले गणेश शिंदे, गणेश पाटील यांचे आभार

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि. 25 जून पावसामुळे उरण नगर पालिकेच्या पाठिमागे असलेल्या नजीरशेठ अपार्टमेंट येथे रस्त्या वर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. पावसाळ्यात येथे चिखल निर्माण होते.व पावसाचे पाणीही मोठ्या प्रमाणात साचते.पावसाचे पाणी भर रस्त्यात साचल्याने तसेच रस्त्यात अनेक खडडे असल्याने या रस्त्यावरून नागरिकांना नीट चालताही येत नव्हते.वाहनांना येण्या जाण्यासाठी सुद्धा व्यवस्थित रस्ता नव्हता.मात्र ही नागरिकांची समस्या लक्षात घेऊन उरण नगर पालिकेचे शिवसेनेचे गटनेते गणेश शिंदे, शिवसेना उपशहरप्रमुख गणेश पाटील यांनी सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण केले. सदर रस्ता गणेश शिंदे, गणेश पाटील यांनी दुरुस्त करून तो रस्ता सिमेंटचा बनवून दिला.गणेश शिंदे व गणेश पाटील यांनी सामाजिक बांधिलकीतून केलेल्या या कार्याचे नजीरशेठ अपार्टमेंटचे रहिवाश्यांनी,सर्व नागरिकांनी, ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याचे कौतूक करत त्यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here