” वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम”

 

लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी👉महादेव गिरी

वालुर येथील स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालयाची उज्वल निकालाची यशाची परंपरा याही वर्षी कायम असुन विद्यालयाचा निकाल 98 टक्के लागला आहे. विद्यालयातुन चि.शिंदे अभिषेक विक्रम या विद्यार्थ्यांने 89.80 टक्के गुण मिळवुन प्रथम आला आहे तर चि.आकाश नागोराव गडदे याने 87.40टक्के गुण मिळवून द्वितीय आला आहे तर कु.संध्या मधुकर जिवणे या विद्यार्थ्यांनीने 84.80 टक्के गुण मिळवुन विद्यालयातुन त्रत्तीय आली आहे.परीक्षेस एकुण 64 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विशेष प्राविण्यसह 19 विद्यार्थीती उतीर्ण झाले तर 30 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उतीर्ण झाले असुन 12 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उतीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संजय साडेगावकर, सचिव महानंदाताई संजय साडेगावकर, राजेश साडेगावकर मुख्याध्यापक एस.डि.भोकरे ,मुख्याध्यापक प्रविण क्षीरसागर ,बि.व्हि.बुधवंत, आर.बि.राठोड, एम.एस. गिरी, डि.आर.नाईकनवरे, एस.ए.महाडिक, जि.एम.कावळे, सौ.एस.आर.सोनवणे, व्हि.एन.बोंडे, बि.बि.मोरे,सौ.जे.बि.शिंदे,सौ.जि.आर. मळी आदिंनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here