नूपुर शर्मा व नवीन जिंदल तसेच अन्य अराजक लोकांनी धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी त्याना अटक करून कारवाई करा,,, विविध मुस्लिम संघटनांची मागणी

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
⭕ठानेदार , तहसीलदार याचे मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, याना निवेदन
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
समाजद्रोही,देशद्रोही नूपुर शर्मा राष्ट्रीय प्रवक्ता भाजपा यांनी 27 मे 2022 ला टीवी नॅशनल चैनल टाईम नाउ च्या डिबेट मधे जगाच्या सम्पूर्ण मानव कल्याणा चे मार्ग दाता सम्पूर्ण क्रांति चे प्रणेता प्रेषित मोहम्मद मुस्तफा सलल्लाहो अलैहे व सल्लम (रहमतुल्लील आलमीन/सरवरे आलम) यांच्या बदल हेतुपुरस्सर पणे

अपमानित शब्दाचा प्रयोग केला ज्यामुळे प्रेषिताना व मानवतेला मानणाऱ्या देशातील नागरिका सह विश्वातील नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.
दरम्यान, 1जून 2022 ला नवीन कुमार जिंदल ने नुपुरच्या समर्थनात त्याच शब्दाचा वापर करून सोशल मीडिया वर टाकले तसेच यति नर्सीमांनन्द व अराजक लोकांनी देशातील सामाजिक सौहार्द बिघडवून शांति भंग करण्याचे कार्य केले.
म्हणून या सर्व अराजक लोकांना समाजद्रोही, देशद्रोही कायद्यानव्ये कारवाई करून देशात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करावी, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
2014 नंतर सरकारच्या संरक्षणात आर. एस. एस व त्यांची राजकीय शाखा भारतीय जनता पार्टी व अनेक सहयोगी संघटना चे पदाधिकारी व कार्यकर्ते,टीवी चे एंकर देशातील मूळ मुद्यानना बगल देत रोज विविध कारणाने वाट्सप,फेसबुक,टिवीटर तसेच टीवी डिबेट मधे मुस्लिमा बदल द्वेष भावणेतून धार्मिक द्वेष पसरविन्याच्या उदेशाने
इस्लाम धर्म व मुस्लिम समाजा बदल काहीतरी खोटे बोलून देशातील शांति,भाईचारा संपवून अराजकतेचे वातावरण बनवन्याचे कार्य सुरु आहे.
या मुळे जगातील सर्वात मोठ्या भारत देशाची लोकशाही प्रतिमा मलिन होत आहे. अशा अराजक लोकांना देशाच्या शांतते करिता विकासा करता अंकुश लावणे जरूरीचे आहे.
या पार्शवभूमीवर गडचांदूर चे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते मो. नासिर खान, राष्ट्रवादी कांग्रेस चे नेते सैयद आबिद अली,माजी सभापति शिवसेने चे अब्दुल हफीज भाई, नगर सेवक निसार शेख, वंचित चे शेख साजिद, एम आय एम चे शेख रऊफ भाई, शेख कादर भाई, शेख दस्तगीर, शोहेल शेख,नवाज बेग,मैनु बेग,यूसुफ शेख,कासिम अली, नजीर बेग,मो आसिफ,सोहेल अली,मोबिन बेग व इतर मुस्लिम बांधवानी यासंदर्भात ठाणेदार,गडचांदूर व तहसीलदार कोरपना यांना निवेदन सादर केले. संविधानाने दिलेल्या धर्मनिरपेक्ष अधिकारा चा वापर करुण प्रेषितांच्या आदेशा प्रमाणे देशाशी प्रेम करने आपले ईमान आहे व कर्तव्य ही आहे. शिवाय कोणाचाही अपमान करने कोणत्या ही प्रकार चे नुकसान करने हे मान्य नाही या सिद्धांता नुसार न्याय मिळे पर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे!
,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here