वादग्रस्त विधान करणाऱ्या नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांना त्वरित अटक करा,,,

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना ठाणेदारांना निवेदन ;
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना –
मुस्लिम समाजाचे धर्मगुरू महम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा , नवीन जिंदाल , नरसीमानंद यांना त्वरित अटक करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मुस्लिम बांधवाना तर्फे
पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना कोरपना चे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्फत देण्यात आले.
यावेळी मौलाना शेर खान, आबिद अली, नगरसेवक निसार शेख, मैनोद्दीन शेख, शब्बीर शेख, रमजान शेख , बशीर काजी , शब्बीर शेख, इरफान कुरेशी, इमरान कुरेशी, सादिक शेख, अशपाक खान, अफसर शेख, जुबेर शेख, अल्लाउद्दीन शेख, समीर शेख, अरमान शेख ,मोबिन बेग, गुडू शेख , यासिर शेख,
नदीम शाहा आदी सह मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते. यावेळी उपस्थितानी वादग्रस्त विधान करणाऱ्यांना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी लावून धरली व महमद पैगंबर यांचा अपमान नही सहेंगे , सविधान का पालन करो , अराजकता बंद करो अशा घोषणा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here