ताडी दुकानांमुळे माणसे मारून महसुल वाढविणे ही कसली निती. – विष्णु कारमपुरी (महाराज)

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- ०८/०६/२०२२ :-* सोलापुरात पाम वाईन नावात सुरू करण्यात आलेल्या शासनमान्य ताडी दुकानातील ताडी विक्रीतुन मिळणारे महसुल म्हणजे गरीब कामगारांचा जीव घेऊन मिळविलेला महसुल आहे. आणि सोलापरातील शासनमान्य ताडी दुकानांचे नमुने तपासणे ही नियम बाह्य झालेली आहे. म्हणून तपासणी अहवाल गृहित धरता येत नाही. म्हणून सोलापुर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क अधिक्षकांनी प्रसिध्दी माध्यमातून दिलेला माहिती ही खरी असली तरी ग्राहकांना व जनतेला सभ्रंमीत टाकणारे माहिती आहे. अशी ठिका ताडी दुकाने (शिंदी) विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक व महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी उत्पादन शुल्क अधिक्षकांवर केली आहे.
सोलापुर शहर व ग्रामीण भागात सोलापुर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क अधिक्षकांच्या माध्यमातुन शासनामान्य एकुण ३२ दुकानांना मान्यता दिली आहे. त्यापैकी २२ दुकाने सध्या सुरू आहेत. परंतु या शासनमान्य ताडी दुकानांना सोलापुर शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विरोध झाला व होत आहे. त्यामुळे ३२ दुकानांपैकी केवळ २२ दुकानेच चालू झाल्या आहेत. हे ताडी दुकानांना विरोध करण्याचा प्रमुख कारण म्हणजे या दुकानात शुध्द व नैसर्गिक ताडी विकली जात नाही. विविध प्रकारचे केमिकम युक्त नशेली व विषारी ताडी विकली जाते. त्यामुळे गोर गरीब कामगार वर्ग आपले जीव गमवतात. म्हणून प्रचंड प्रमाणात विरोध झाला.
पाम वाईनच्या नावाने शासनमान्य ताडी दुकाने चालू करण्यासाठीचे समितीच्या अहवालामध्ये ताडी नमुने तपासणी करण्याचे निकष व नियम पुर्णपणे वेगळे आहेत. परंतु त्या नियमांचा भंग करून मुंबई हपकिन इंटस्टुटकडे ३७ ताडी नमुने पाठविणे हे गैर व बेकायदेशीर आहे. त्याचबरोबर उत्पादन शुल्क अधिक्षक नितिन धार्मिक हे महसुल वाढीच्या नावाखाली शासनाचे व जनतेमध्ये दिशाभूल करीत आहे. ही अत्यंत केदाची बाब आहे. म्हणजेच गोरगरीब कामगारांचे जीव घेऊन महसुल वाढविणे याला महसुल वाढ म्हणत नाहीत. असाही टोला विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी लगावला एकुणच शासनमान्य ताडी दुकानातील ताडी तपासणीबाबत पुर्णपणे चुकीचे व संभ्रमीत करण्याचे माहिती प्रसिध्दी करण्यात आली. याबाबत महाराष्ट्र कामगार सेना व ताडी (शिंदी) दुकाने विरोधी संघर्ष समितीच्या वतीने जनजागृती अभियान राबविण्यात येईल. असे विष्णु कारमपुरी (महाराज) नेमण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here