चना खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टर सुरु करा* *आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मागणी

 

लोकदर्शन 👉मोहन भारती

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चना पीक घेण्यात येते. परंतु अस्मानी व सुलतानी संकटामुळे आधीच शेतकरी हवालदिल होत असतो. त्यातच शासकीय आधारभूत चना खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टर बंद करण्यात आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे आता चना खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टर सुरू करण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी प्रत्यक्ष मुंबई येथे सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन हि मागणी केली आहे. त्यावर सकारात्मक निर्णय घेत काही दिवसातच हि प्रक्रिया सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

वरोरा केंद्रावर १४७७ शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली असून १०७ शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी बंद झाल्यामुळे चना खरेदी होऊ शकली नाही. जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती आहे. लाखो टन चना शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. आता शेतकऱ्यांना लग्न व शेतीचे कामे असल्यामुळे त्यांना पैशाची चणचण असते. त्यामुळे खासगी व्यापारी त्यांच्या माल कमी भावाने विकत घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक लूट थांबविण्यासाठी व मालाला योग्य भाव मिळण्याकरिता चना खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टर सुरु करा अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे. हि प्रक्रिया लवकर झाल्यास हजारो शेतकऱ्यांच्या प्रश्न मार्गी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here