पिपर ग्राम पंचायतच्या नवनिर्वाचित सदस्या सौ ज्योतीताई व जनेकर यांचा सत्कार समारंभ संपन्न

लोकदर्शन 👉 लोकदर्शन

येनार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीत विजय निश्चित
श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपणा तथा जिला उपाध्यक्ष यांनी विश्वास व्यक्त केला

कोरपना तालुक्यातील पीपरी ग्राम पंचायत पोट निवडणूकीत वार्ड क्र तिन मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सौ ज्योती ताई वसंतराव जेनेकर यांचा 52 मतांनी दनदनीत विजय झाला मा श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार माझी वित्त,नियोजन,वन तथा पालकमंत्री,श्री हंसराजी अहिर माझी केंद्रीय गृहराज्यमंत्री,श्री संजय भाऊ धोटे माझी आमदार राजुरा,श्री देवराव भाऊ भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांच्या विकास कामांचा झंझावात पाहाता पिंपरी ग्राम वासियांनी कॉंग्रेस व शेतकरी संघटनेच्या उमेदवारालचा 52 मतांनी पराभव केला ही निवडणूक भाजपा युवा नेते श्री अनिल चांदेकर, विलास चालेकर व महादेव पावडे यांच्या नेतृत्वात लढविली मोलाचे सहकार्य रमेश तुरंणकर,भाऊजी तिखट, साईनाथ तिखट ग्रामपंचायत सदस्य,सागर पाटील झाडे, गजानन तुरणकर,हरिभाऊ देवतळे, तुळशीराम तिखट,बंडु पावडे, गुलाब मेश्राम, गिरीधर मेश्राम,उमेश तुरणकर, रमेश तिखट, मधुकर जेनेकर तसेच ग्राम वासियांनी भरभरून मदत केली श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांनी नवनिर्वाचित सदस्या सौ जोतीताई वसंतराव जेनेकर यांचा शाल, श्रीफळ,पुष्पहार घालून पेढे भरउन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात ही निवडणूक पीपरी येथील भाजपा च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व गावकर्यांनी मिळुन कॉग्रेस व शेतकरी संघटनेचा अशा अभद्र युती ला पराभूत केले व समोर होनार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीत आमचा विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला व सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे संचालन श्री अनिल चांदेकर यांनी केले तर आभार साईनाथ तिखट यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here