माजी जी. प. सभापती सुनील उरकुडे यांची सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री बाझारे यांच्यासोबत चर्चा

 

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर

*निवेदनाद्वारे रामपूर गोवरी पोवणी रस्त्याचे काम पावसाआधी करून नागरिकांना ये-जा करण्याच्या स्थितीत आणणे तसेच अनेक कामाची मागणी*

राजुरा:-

जी. प. चे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री बाझारे यांची भेट घेत निवेदनाद्वारे अनेक कामाची मागणी केली आहे. प्रामुख्याने गोवरी पोवनी रामपूर लगत रस्त्याचे काम पावसापूर्वी करून नागरिकांना ये-जा करण्याच्या स्थितीत आणणे तसेच रामपूर माथरा गोवरी पोवनी गावालगत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिट रोडला मजबुतीकरीता नित्यनेमाने पाणी मारणे, रस्त्याच्या कडेला दुतर्फा पेव्हर ब्लॉक बसविणे, वेकोली द्वारा परिवर्तित रस्त्यावर स्ट्रीट लाईट लावणे व निष्कृष्ट झालेले काम योग्य करवून घेणे या मागण्यांची चर्चा करून निवेदन देण्यात आले.
त्यावेळी जी. प. सभापती सुनील उरकूडे यांच्या शिष्टमंडळात प्रामुख्याने पोवनी गावचे सरपंच पांडुरंग पोटे, कळमना ग्रामपंचायत सदस्य दिपक झाडे, अजय राठोड, नितीन पावडे व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here