पिंपरी खुर्द येथील युवक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस मधे प्रवेश

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात

आटपाडी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विस्तार करणे याकामी अनंत अडचणी आहेत परंतु या अडचणीवर मात करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री सुरज पाटील यांनी आपल्या कामातून युवकांचे संघटन मजबूत करण्याचा यशस्वी प्रयत्न करीत असल्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो नामदार जयंत पाटील साहेब आपल्या सर्वांचे नेते आहेत त्यांच्या पाठीमागे युवकांची शक्ती उभी करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे हे काम आटपाडी तालुक्यामध्ये सुरज पाटील यांच्या रूपाने होत असल्याबद्दल आम्हा सर्वांना आनंद आहे असे उदगार आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी काढले पिंपरी खुर्द येथे जाधव मळ्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब काका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली युवकांचे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी हणमंतराव देशमुख बोलत होते सदर कार्यक्रमांमध्ये सुरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी उपसरपंच आशिष जाधव यांचेसह अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला याप्रसंगी युवक नेते माजी उपसरपंच अशिष जाधव यांनी सुरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्वजण निष्ठेने काम करून राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करू सुरज पाटील यांचा शब्द आमच्यासाठी अखेरचा असेल असे वचन हे त्यांनी पिंपरी गावातील लोकांच्या वतीने जाहीरपणे दिले सुरुवातीला पिंपरी गावचे श्री सुरेश कदम यांनी प्रास्ताविक भाषण करून पिंपरी गावचे प्रश्न रावसाहेब काकांनी जयंत पाटील यांच्या माध्यमातून सोडवावेत अशी मागणी करून सुरज पाटील यांनी यावेळी करगणी जिल्हा परिषद ची निवडणूक लढवावी अशी मागणीही त्यांनी केली. अध्यक्ष भाषणामध्ये श्री रावसाहेब काका पाटील म्हणाले महाराष्ट्राचे नेतृत्व जयंत पाटील साहेबांच्या रूपाने सांगली जिल्हा कडे येणार आहे त्यासाठी आपण खानापूर आटपाडी मतदार संघातून त्यांच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती उभी करून राज्याच्या राजकारणात त्यांचे हात शक्तिमान केले पाहिजेत लोकनेते राजाराम बापूं च्या नंतर दुष्काळी भागाला पाणी देण्याच बापूंचे अपुरे स्वप्न जयंत पाटील यांनी टेंभू योजनेचे पूर्तता करून पूर्ण करीत आहेत त्याबद्दल आटपाडी तालुक्यातील जनता त्यांना मनापासून धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही आपले कोणतेही प्रश्न असो ते मी नामदार जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन अशी ग्वाही रावसाहेब काकांनी उपस्थितांना दिली. सदर कार्यक्रमात यमाजी पाटलाची वाडी चे नेते विष्णू पाटील निंबवडे गावचे ग्रामपंचायत सदस्य गणेश कबीर युवकांचे नेते श्री सुरज पाटील यांची यथोचित भाषणे झाली याप्रसंगी आटपाडी गावातील माजी डेपोटी सरपंच श्री विलास नांगरे पाटील पिंपरी खुर्द चे माजी उपसरपंच काकासाहेब जाधव , बोंबेवाडीचे नेते दिनकर करांडे आटपाडीचे धडाडीचे नेते श्री प्रभाकर नागरे पाटील कौठळी गावचे विपुल शेठ कदम सचिन शेठ कदम तसेच युवक तालुका उपाध्यक्ष दीपक पाटील सुभाष माने राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष देवकर सर हिंदी भाषिक सेलचे अध्यक्ष एस एल पाटील पिंपरी गावच्या सोसायटीचे संचालक भाऊसाहेब देशमुख तुकाराम जाधव आटपाडीचे शिवाजी नरसु जाधव युवकचे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत पाटील पक्षाचे तालुक्याचे सरचिटणीस समाधान भोसले उद्योगपती अतुल शेठ पाटील संतोष पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया चे तालुकाध्यक्ष किशोर गायकवाड युवक तालुका सरचिटणीस नितीन डांगे , संजय पुजारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या समारंभाचे सूत्रसंचालन दलित समाजाचे नेते श्री गणेश ऐवळे यांनी केले

चौकोन.
पिंपरी खुर्द चे युवक नेते सुरेश कदम यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष सुरज पाटील यांनी करगनी जिल्हा परिषद गटा मधून निवडणूक लढवावी अशी मागणी केली तर प्रवेश केलेले पिंपरी खुर्द चे माजी उपसरपंच आशिष जाधव यांनी या पुढे तालुक्याचे जेष्ठ नेते रावसाहेब काका पाटील व सुरज भैया पाटील यांचा शब्द अंतिम मानून काम करू असे जाहीर केले

फोटो साठी
माजी उपसरपंच आशिष जाधव व कार्यकर्त्यांचा सत्कार करताना जेष्ठ नेते रावसाहेब काका पाटील हणमंतराव देशमुख , सुरज पाटील विलास नांगरे, प्रभाकर नांगरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here