रामचंद्रराव धोटे ज्युनियर कॉलेजचा १०० टक्के निकाल.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा शहरातील नामांकित संस्था इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित रामचंद्रराव धोटे ज्युनियर कॉलेजच्या इयत्ता १२ वी चा सत्र २०२१ – २०२२ चा निकाल १०० टक्के लागला असून मागील अनेक वर्षांपासून सातत्याने १०० टक्के निकाल देवून महाविद्यालयाने याही वर्षी बाजी मारली आहे.
आज जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता १२ वी च्या निकालात महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्रतिभा इटणकर ८५ टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम आली आहे. कु. दिव्यानी डाहुले ८२.३३ टक्के गुण घेऊन द्वितीय तर उज्वल बेले ८१. ३३ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे. एकूण २० पैकी १५ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत तर ५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजित धोटे, रामचंद्रराव धोटे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य समीर पठाण, रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here