शिवम तांडेल याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

 

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 5 जून
प्रतीक पाटील फाउंडेशन व शिवम डेव्हलपर्स यांच्या तर्फे कुमार शिवम शंकर तांडेल यांचा वाढदिवस कातकरी वेशवी वाडी येथे सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.
कुमार शिवम शंकर तांडेल यांनी वाढदिवसाच्या निमित्त कातकरी वेशवी वाडी येथे मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित प्रतीक पाटील उपशहर प्रमुख शिवसेना द्रोनागिरी शहर तथा प्रतीक पाटील फाउंडेशन संस्थापक, रवींद्र पाटील व्यापारी असोसिएशन अध्यक्ष द्रोनागिरी, शिक्षक रमनिक म्हात्रे, संचालक विपुल शहा,कुमार हितेश घरत युवा सेना अधिकारी सेक्टर 48 आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here