महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या वतीने सामाजिक धोरणांवर चर्चासत्र संपन्न…!

लोकदर्शन मुंबई 👉-दादर (प्रतिनिधी -सिद्धी कामथ)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या वतीने बुधवार दिनांक ०१/०६/२०२२ रोजी सायंकाळी ७.०० वाजता टिळक भवन, दादर येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षा विद्या कदम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. या सभेत लोकोपयोगी काही सामाजिक उपक्रम राबवुन सामान्य जनतेच्या समस्यांचे निवारण कशाप्रकारे करता येईल. त्याचे सामाजिक धोरण काय असेल आणि त्यासाठी कोणती निर्णायक पावले उचलली गेली पाहिजेत याचा आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते कसे मार्गी लागतील आणि त्यांसाठी कोणत्या उपाययोजना आखल्या पाहिजेत याबाबतीत चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रशासकीय सल्लागार प्रज्ञा वाघमारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या चर्चासत्रात सम्राट साळवी, फरजाना इकबाल, सिद्धी कामथ, महेश्वर तेटांबे, आमिर कडीवाला, रमाकांत बोरुडे, सुरेखा बांदिवडेकर
अमोल थोरात, समीर चव्हाण आदी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. विशेष करून या चर्चेसाठी प्रज्ञा वाघमारे यांनी सांस्कृतिक विभागाला निमंत्रित केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here