विरूर स्टेशन येथे युवक काँगेसची बैठक संपन्न.

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा :- राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे युवक काँग्रेस ची संघटनात्मक बैठक संपन्न झाली. गावातील स्थानिक समस्या युवक कार्यकर्त्या कडून जाणून घेतल्या व विरूर स्टेशन मध्ये युवक काँग्रेसला कशा पद्धतीने बळकटी देता येणार यावर चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्र युवक काँग्रेस च्या वतीने आयोजीत माझा गाव माझी शाखा या उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली व विरुर स्टेशन येते लवकरात लवकर माझा गाव माझी शाखा यांचें लोकार्पण करण्यात येईल याबाबत चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, जिल्हा महासचिव प्रणय लांडे, राजुरा विधानसभा अध्यक्ष मंगेश गुरनुले, इर्शाद शेख, चेतन जयपुरकर ,इरफान सय्यद, प्रवीण चिडे, राकेश रामटेके, ज्ञानेश्वर तुराणकर, विकेश मोरे ,प्रणव येरोजवार, बापूची उपरे ,रमेश सिडाम ,आशिष जिवतोडे, अतुल उपरे चिराग डब्बा ,रजनीकांत आत्राम, पृथ्वीराज कोडापे, सतीश चिंतरवार, रामभाऊ भगत, नयन उराडे, दर्शील चिडे, सुरेंद्र वेलादे यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here