श्री. रूपेश्‍वर गुरनुले यांच्‍या निधनाने शिक्षण क्षेत्र उत्‍तम शिक्षकाला मुकले – आ. सुधीर मुनगंटीवार

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ. संध्‍याताई गुरनुले यांचे पती श्री. रूपेश्‍वर गुरनुले यांच्‍या निधनाने भाजपा परिवारातील ज्‍येष्‍ठ व्‍यक्‍तीमत्‍व हरपल्‍याची शोक भावना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.

श्री. रूपेश्‍वर गुरनुले यांनी शिक्षक, मुख्‍याध्‍यापक म्‍हणून शिक्षण क्षेत्रात उल्‍लेखनिय योगदान दिले आहे. साधेपणा हे त्‍यांच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाचे वैशिष्‍टय होते. शिक्षण क्षेत्र एका उत्‍तम शिक्षकाला मुकले असल्‍याची भावना भावना आ. मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. त्‍यांच्‍या कुटूंबियांना या दुःखातुन सावरण्‍याचे बळ परमेश्‍वर देवो व त्‍यांच्‍या पुण्‍यात्‍म्‍याला शांती प्रदान करो असेही आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here