गोंडवाना विद्यापीठ आदिवासी युवक युवतीसाठी आशेचा किरण* *विद्यापीठ सर्वांगसुंदर बनविण्यासाठी प्रशासनाने गतीने पावले उचलावीत!* *आढावा बैठकीत आ सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

By ÷Shivji Selokar

*⭕३४ कोटी ५० लक्ष निधीची मगणी करणार*

मुंबई : गोंडवान विद्यापीठ आदिवासी आणि वनक्षेत्रातील युवक-युवतींच्या भविष्या करिता आशेचा किरण आहे; हा विद्यापीठ परिसर सर्वांग सुंदर व्हावा आणि येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून आवश्यक निधीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देत विद्यापीठ प्रशासन तसेच वन विभागानेही या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशा सूचना विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख, माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विधान भवन मुंबई येथे गोंडवाना विद्यापीठाच्या प्रगती संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ बोकारे, डॉ अनिल चिताडे, सहसचिव संजय इंगळे आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, गोंडवाना विद्यापीठाला आदिवासी आणि वन विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी सर्वांकश प्रयत्न सुरू आहेत. मौजे अडपल्ली येथील जमीन भूसंपादननाकरिता आवश्यक ते सर्व प्रयत्नही सुरू आहेत. सुमारे दोनशे एकर जमीन ताब्यात घेऊन परिसर भव्य व सर्वांत सुंदर व्हावा यादृष्टीने शासकीय स्तरावर कुठेही कुचराई होता कामा नये. महाराष्ट्र विधिमंडळाच्या येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्याद्वारे विद्यापीठासाठी 34 कोटी 50 लक्ष रुपयांची मागणी शासनाकडे मी करणार आहे असेही श्री मुनगंटीवार यांनी बैठकीत स्पष्ट केले. विद्यापिठाची इमारत आणि परिसर सुसज्ज व देखणा करण्यासाठी विख्यात आर्किटेक्टची मदतही घेतली जाईल असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here