स्व. राजीव गांधींचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी. –आमदार सुभाष धोटे.

.
लोकदर्शन 👉 मोहन भारती


⭕काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना अभिवादन.

राजुरा :– भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार सुभाष धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला वंदन करून अभिवादन करण्यात आले. स्वर्गीय राजीवजी गांधी यांचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी आहेत त्यामुळे सर्वांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन जिवनात यशस्वी होण्यासाठी परिश्रम घ्यावे असे मत आमदार सुभाष धोटे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या लोकप्रिय आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे, राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कार्याध्यक्ष एजाज अहमद, ईरशाद शेख, जगदीश बुटले, रामदास आत्राम, दिलीप लांडे, वासुदेव चापले, मारोती बोढेकर, मुर्लीधर आत्राम, हेमंत झाडे, प्रा. प्रफुल्ल शेंडे, प्रशांत तेल्कापल्लीवार, जितेंद्र चौधरी, जितेंद्र नवघरे यासह अनेकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here