नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत चंद्रपूर च्या खेळाडू चे घवघवीत यश                                                       

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
चंद्रपूर
फायटर स्केट इंडिया फौंडेशनच्या वतीने स्केट चॅम्पियनशिप इंडिया 2022 अंतर्गत सेंट्रल इंडिया फर्स्ट नाईट नॅशनल स्पीड स्केटिंग चॅम्पियन शिप 2022 स्पर्धेचे आयोजन नागपुरात गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे 14,15 मे ला करण्यात आले होते.
या स्पर्धेत चंद्रपूर च्या खेळाडूनी रिंक रेस व रोड रेस मध्ये सुवर्णपदक,कांस्यपदक, रजतपदक मिळवून चंद्रपूर जिल्ह्याचे नाव चमकविले,
विजेत्या खेळाडू मध्ये शिवसाई प्रतिष्ठान ची युगाज्ञा रामटेके नी सुवर्णपदक,अधिष्ठान नगराळे,प्राची पुणेकर , यांनी कांस्यपदक,वैभव धुर्वे ,सोहम पोहनकर ,नक्ष वैरागडे,आरुषी वैरागडे,शिवण्या एकरे,निकुंज काळे,कार्तिक मुत्यलवार,आरुष पुल्लावार,याने रजतपदक पटकीवले,सर्व खेळाडू ला प्रशिक्षक आतिष धुर्वे यांचे मार्गदर्शन मिळाले,
स्पर्धेचे उद्घाटन फायटर स्केट इंडिया फौंडेशन पुणे चे संचालक अथर्व देशपांडे यांच्या हस्ते झाले.प्रमुख अतिथी म्हणून ,गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कुल च्या प्राचार्या होत्या.

पदक प्राप्त केलेल्या सर्व खेळाडू चे सर्वत्र अभिनंदन केले जाते आहे.
विनोद नगराळे,प्रा. सी.एफ.रामटेके,भदंत पुणेकर,आतिष धुर्वे,वैभव सर,कपिल पेठे ,व इतरांनी विजेत्या खेळाडू चे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
,

,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here