राजुरा येथील विद्यार्थीनी कु.रिया लेखराजानी हिने पुणे विद्यापिठातून पटकावीले सहा सुवर्णपदक माजी आमदार निमकर यांनी केला सत्कार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

राजुरा÷राजुरा येथील व्यापारी, राहुल ट्रेडर्स चे संचालक सुनिल लेखराजानी यांची कन्या कु.रिया हिने एम.बी.ए.(फायनान्स) या विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातून साहा(०६) सुवर्पदक पटकाविल्याबद्धल पुणे येथे राज्याचे उच्च व तन्त्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राष्ट्रीय मुल्यांकन आणी मान्यता परिषदेचे अध्यक्ष डॉ.भुषण पटवर्धन, पुणे विधापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमळकर व मान्यवरांच्या हस्ते साहा सुवर्णपदक देऊन दि.12.05.2022 रोजी सन्मानित करण्यात आले होते. त्याप्रित्यर्थ दि.16.05.2022 रोजी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी मित्रमंडळा समवेत घरी जाऊन कु. रिया चा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील उज्वल वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अनिल हस्तक, अशोक मेडपल्लीवार, श्रीकांत दिक्षीत, सुरेश लेखराजानी प्रमुख्याने उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here