चंद्रपूर च्या युगाज्ञा रामटेके नी स्केटिंग स्पर्धेत पटकीवले 3 सुवर्णपदक।।                                                     

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
चंद्रपूर
फायटर स्केट इंडिया फौंडेशनच्या वतीने स्केट चॅम्पियनशिप इंडिया 2022 अंतर्गत सेंट्रल इंडिया फर्स्ट नाईट नॅशनल स्पीड स्केटिंग चॅम्पियन शिप 2022 स्पर्धेचे आयोजन नागपुरात गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे 14,15 मे ला करण्यात आले होते.
या स्पर्धेत चंद्रपूर ची खेळाडू कु,युगाज्ञा चरंदास रामटेके हिने उत्कृष्ट कामगिरी केली, रिंक रेस व रोड रेस मध्ये 3 सुवर्णपदक मिळविले.
स्पर्धेचे उद्घाटन फायटर स्केट इंडिया फौंडेशन पुणे चे संचालक अथर्व देशपांडे यांच्या हस्ते झाले.प्रमुख अतिथी म्हणून विलास देशपांडे,गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कुल च्या प्राचार्या होत्या.
युगाज्ञा ला प्रशिक्षक आतिष धुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले,
युगाज्ञा ने सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जाते आहे.
युगाज्ञा ही
पेल्लोरा येथील संजय गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यरत प्रा, डॉ,चरंदास रामटेके यांची मुलगी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here