आटपाडी 15 वा वित्त योजनेतून कारखाना रोड डांबरीकरण! वृषाली पाटील सरपंच

लोकदर्शन 👉 राहुल खरात

आटपाडी ग्रामपंचायत १५ वा वित्त योजना निधितुन आटपाडी ग्रामपंचायत वार्ड नंबर २ कारखाना रोड ते संजय वाघमारे घराकडे जाणारा रस्ता सिमेंट कांक्रिटकरण
करणे या चालु असलेल्या कामाची पाहणी आटपाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील व अखिल भारतीय सरपंच संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲडवोकेट श्री.धनंजय पाटील यांनी केली व नागरिकांच्या इतर समस्याही जाणून घेतल्या. अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्यामुळे नागरिकांनी विशेष समाधान व्यक्त केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मेटकरी, प्रकाश मरगळे, राजेंद्र बालटे,
संजय वाघमारे, अधिकराव कदम, ठेकेदार प्रकाश माळी व पंचायत समिती चे इंजिनिअर श्री. बाजीराव पाटील तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. Yg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here