आटपाडी मध्ये १५ वा वित आयोग मधून ग्रामपंचायतची कामे सुसाट! वृषाली पाटील सरपंच , यांनी केली कामाची पाहणी

 

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात

आटपाडी ग्रामपंचायत १५ वा वित्त योजना निधितुन आटपाडी ग्रामपंचायत वार्ड नंबर २ जनावरांचा दवाखाना मागील जुगदर घर ते संभाजी पाटील घर पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करणे या चालु असलेल्या कामाची पाहणी आटपाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील व अखिल भारतीय सरपंच संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲडवोकेट श्री.धनंजय पाटील यांनी केली व नागरिकांच्या इतर समस्याही जाणून घेतल्या. अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्यामुळे नागरिकांनी विशेष समाधान व्यक्त केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री. बाळासाहेब मेटकरी, श्री. प्रकाश मरगळे, श्री.राजेंद्र बालटे, सचिन सपाटे, उमेश जुगदर, संभाजी देशमुख, दादासाहेब जाधव, महंमद शेख व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here