स्नेहसंमेलन एक आठवण

लोकदर्शन मुंबई ;👉 राहुल खरात

के एम एस ८७ मित्र-मैत्रीणींच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि आपला समूह प्रमुख *प्रविण राणे, मोहन आठवले आणि सौ.मीना वैद्य* यांच्या अथक प्रयत्नाने यशस्वी झालेल्या *संजय चाचे, भूषण धापते आणि संदेश तांबे* *युवराज कोकीळ* यांच्या विचारातून लाभलेला आठवणींचा ठेवा (स्मृती चिन्ह) आणि आपणच आपल्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर ऊभे राहून *सुधीर खापरे* याच्या मुलीने बनवलेला अप्रतिम केक *मंगेश कुंटे* ची गोड कन्या *कु.वेदा* च्या हस्ते केक कापून *अभी तो हम जवा है|* हे सर्वांनी दाखवून दिले.
काहीजण कौटुंबिक कार्यक्रम आणि इतर कारणांमुळे येऊ शकले नाहीत तर मैत्रीची कायमच ओढ असलेला गजा (गजानन निवतकर) आपल्या घरातला कार्यक्रम कुटुंबावर सोडून आपल्याला भेटायला आला.
तर काही जण प्रकृती ठीक नसूनही गोळ्या औषधे घेऊन या मैत्रीच्या ओढीने आले आणि या मैत्रीच्या ऑक्सिजन ने त्यांना तरतरी आली.
खास आभार *गीता उदास* चे कारण आपला समूह चालू झाल्यापासून काही कारणाने तीची आठवण सर्वजण काढायचे पण भेटण्याचा योग येत नव्हता. तो योग भूषणचा वाढदिवस आणि आज जूळून आला.
प्रशांत पोसे ने आज दिवसभर संगीताची मेजवानी देऊन सर्व वातावरण संगीतमय केले तर *पराग स्वार* च्या सुरेल आवाजाने सुखद धक्का दिला.
पाण्याच्या डोहातले (स्विमिंग) नाच, चेंडूफेक असो नाहीतर पावसातला नाच असो अगदी शाळेतील सहलीसारखी सर्वांनी धमाल, मस्ती, विनोद, थट्टा, मस्करी, टक्के-टोणपे अशा अनेक गमतीजमती करून धमाल उडवून दिली.
प्रत्येकजण आपल्या आयुष्यात स्थिरस्थावर झाला आहे मोठ्यापदावर विराजमान झाला आहे पण या सोहळ्यात तो कुणाच्या ना चेहर्‍यावर ना कुणाच्या वागण्यात जाणवत नव्हता हे आपल्यावर झालेल्या संस्काराचे आणि मैत्रीच्या ॠणानूबंधाचे द्योतक आहे.
कार्यक्रमाची सुसूत्रता सांभाळणारी *सौ. दिपा घाडगे* चे अप्रतिम सादरीकरण…*सौ.शारदा पालकर निवाते* …शिक्षिका आणि लेखिका या दोन्ही क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करणारी मैत्रीण आपल्याला गवसली ती एक वेगळ्या स्वरूपात…
आज तीने स्वतः लिहीलेले पुस्तक *सात ते साडेबारा* आपल्या पुस्तकमित्रांना भेट दिले. तो वाटपाचा क्षण मोहून टाकणारा होता. आपल्या पुस्तकाचे आपण वाटप करतोय आणि आपले मित्र पुस्तकावर स्वाक्षरी मागत आहेत आणि आपण ती स्वाक्षरी देताना जो आनंद आणि समाधान असते ते शब्दात नाही सांगता येत.
स्नेहसंमेलनाची वेळ संपत आलेली असताना *जनार्दन चव्हाण* याने नवरंग चित्रपटातील *ज़ारे नट़खट़* गाण्यावर केलेले नृत्य अप्रतिम होते. तिथे बसलेल्या प्रत्येकाने नकळत उत्स्फुर्तपणे टाळ्यावाजवून गाणे संपेपर्यंत दाद दिली. गाणे, नृत्य संपल्यानंतर टाळ्या वाजत राहील्या. आणि आमचा ऊर अभिमानाने भरून आला. प्रत्यक्ष कधी पाहिलेले नव्हते पण स्री-पुरूषाची भुमिका एकाच वेळी आणि एकाच गाण्यामध्ये करणं कीती अवघड नव्हे अशक्यच आहे हे तो नृत्य करताना जाणवत होतं.
खरं सांगू नृत्य संपलं आणि डोळ्यात अश्रू दाटले कारण हा नृत्याविष्कार अचंबीत करणाराच होता.

हे सर्व प्रशंसेस पात्र आहेत पण त्याच बरोबर इथे आलेला प्रत्येकजण एक ऊत्साहाचा झरा होता आणि कायमच राहणार आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *