शिवाई प्रबोधन वाचनालयास मा.संजय मलमे साहेब व सचिन कदम साहेब यांची सदिच्छा भेट                               

लोकदर्शन 👉 राहुल खरात।

* *⭕आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड संचलित पलूस येथील शिवाई प्रबोधन वाचनालयास दैनिक नवशक्तिचे मुंबई आवृत्ती संपादक मा.संजय मलमे साहेब व दैनिक पुण्यनगरी सांगली विभाग आवृत्तीचे संपादक सचिन कदम साहेब यांची सदिच्छा भेट*

रविवार दि.८मे २०२२ रोजी वत्तपत्र क्षेत्रातील वरील मान्यवर महोदयांनी पलूसच्या शिवाई प्रबोधन वाचनालयास सदिच्छा भेट देऊन सुसज्ज वाचनालय पाहून समाधान व्यक्त केले व ग्रंथालय चळवळ तळागाळात रुजवण्यासाठी ब्रिगेडच्या वतीने चाललेल्या प्रयत्नास शुभेच्छा दिल्या. यावेळी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्याध्यक्ष दगडू जाधव यांच्या हस्ते मा. संजय मलमे साहेब यांचा सत्कार करण्यात आला तर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे यांच्या हस्ते मा. सचिन कदम साहेब यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दैनिक पुण्य नगरीचे पलूस तालुका प्रतिनिधी सुनिल पुदाले सर, ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष सुनिल दलवाई, राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे,सौ. कल्पना मलमे सौ.संगिता मलमे,श्रुती मलमे ,वरदराज मलमे व इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here