लोकदर्शन 👉 राजेंद्र मर्दाने
वरोरा – आनंदवनाच्या निर्मितीत बाबा आमटे यांच्या सोबत आपल्या आयुष्याच्या समिधा अर्पण करणाऱ्या त्यांच्या पत्नी दिवंगत साधनाताई आमटे यांच्या ९६ व्या जन्मदिनी आनंदवनातील श्रध्दावनात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या समवेत डॉ.विजय पोळ, सुधाकर कडू ,अरुण बक्षी ,कवीश्वर काका, राजेश ताजणे प्रामुख्याने उपस्थित होते. श्रद्धेय साधनाताई आमटे आनंदवनाच्या निर्मितीत बाबा आमटे यांना मोलाची साथ दिली. अत्यंत कठीण प्रसंगी त्यांनी योग्य निर्णय घेऊन आनंदवनाचे प्रश्न सोडविले. कुष्ठबाधित विवाह विवाह या यक्ष प्रश्नावर साधनाताई आमटे यांनी पुढाकार घेऊन कुष्ठबाधितांना वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगता यावा यासाठी आग्रह धरला होता .अनेक कुष्ठरोग्यांचे विवाह घडवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. साधनाताई आमटे यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी आनंदवनातच निधन झाले. आज त्यांच्या ९६ व्या जयंती दिनी सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर, आनंदवनातील असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्मृतीस्थळास भेट दिली व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.