बिबी येथे रमजान ईद उत्साहात साजरी ,,,,,,,,,,,,,,,,,,,, इदगाह मैदानावर बालकांनी गळाभेट घेऊन दिल्या ईद च्या शुभेच्छा।                                                           

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,

गडचांदूर:
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना तालुक्यातील बिबी येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईद निमित्त राष्ट्र विकासाकरिता सामुहिक प्रार्थना करण्यात आली. रमजान ईद निमित्त सकाळी बिबी येथील ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी पारंपरिक वेशात अबालवृध्द मोठया संख्येने उपस्थित होते. सामुहिक नमाज पठणानंतर आला हजरत मस्जीद बिबी चे मौलाना तहसिन रजा यांनी धर्मसंदेश देण्यासह राष्ट्राच्या समृध्दी, सुरक्षा आणि सुयशाकरिता विशेष सामुहिक प्रार्थना केली. राष्ट्रात सौहार्दपूर्ण वातावरण कायम राहणे आणि परस्परांमध्ये निकोप प्रेम वाढण्यासह अपप्रवृत्तींपासून लांब ठेवण्याकरिता याचना करण्यात आली. त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगार, आजारी नागरिकांना चांगले स्वास्थ्य आणि अडचणीत असलेल्या नागरिकांची समस्येतून सुटका व्हावी याकरिता प्रार्थना करण्यात आली. नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी दफनभूमीत जाऊन आप्त व स्वजनांच्या थडग्यांवर फुले वाहून आदरांजली वाहिली.

परस्परांना आलिंगन देत ` ईद – मुबारक ` म्हणत शुभेच्छा देण्यात आल्या. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी म्हणून रात्रंदिवस अपार कष्ट घेत असलेले आपले पोलिस कर्मचारी मात्र कोणतेही सण उत्सव आपल्या व्यस्ततेमुळे साजरा करू शकत नाही बिबी येथे इदगाह मैदानावर गडचांदुर पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे, पोलिस कर्मचारी इंदल राठोड, तिरुपती माने, ज्योती बल्की,सुषमा आडकिने , ह्यांनी आपल्या व्यस्त बंदोबस्तात ही ईदगाह वर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व मौलाना तहसिन रजा यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला . तसेच आला हजरत कमेटी तर्फे पोलिस कर्मचार्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या वेळी आला हजरत कमेटी बिबी चे अब्बास शेख,सादिक शेख,रहीम शेख,अकबर शेख, पत्रकार हबीब शेख,इम्रान शेख, गौस सिद्दीकी,अक्रम शेख , अफरोज शेख ,नसीम शेख उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *