सुशिक्षित तरुणामुळे सेलू तालुक्यातील आंबा अमृतसर हैदराबाद मार्केट मध्ये।

लोकदर्शन सेलू –👉 महादेव गिरी

  • परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथील शेतकरी प्रेरणा घेत फळबाग लागवडी कडे वळले त्यातून आमराई विकसित झाली आहे व शेतकरी युवक ना अर्थकारण ला बळकटी मिळाली आहे तालुक्यातील शेतकरी पारंपरिक पीक पद्धती वर अवलंबून असते फळ पिकाचे क्षेत्र कमी होते शेतकरी पूर्वी पाच दहा झाडाची लागवड बांधावर करीत असत असेच सेलू येथील रहिवासी शेतकरी श्री मेहराज अलीउर्फ सिकंदर अजिजअलीखान यांनी आपले शिक्षण बी एसी ऍग्री वसंतराव नाईक मराठवाडा कृषीविद्यापीठ परभणी घेऊन नोकरी च्या पाठी मागे न लागता घर च्या वरीष्ठ मंडळी च्या सहाय्याने त्या वर परिसर चा अभ्यास केला व सिचन स्त्रोत चे बळकटीकरण करून 15 फूट बाय 5 फूट अंतर ठेवून सन2018 ला आंबा लागवड केली ती आज उंची 7 फूट आहे या बरोबर पेरू चिकू सीताफळ ची लागवड केली आहे ही आमराई लागवड 1 हेकटर 20 आर मध्ये 40 जातीचे आंबे एकूण 1550 झाडे लागवड केल्या गेली या मध्ये केसर ची झाडे 1200 आहेत दसेरी, लंगडा, चौसा, सिधु, भुर्जा,मलिका,शहाजन मंनगोवा,आदी जातीचे लागवड केल्या गेली आहे परभणी रोड वर येणाऱ्या जाणाऱ्या लक्ष वेधून घेत आहे पहिल्या वर्षाचे आंब्याचे उत्पादन 8 टन होणार आहे सद्या हा आबा अमृतसर,हैद्राबाद मार्केट ला जात आहे तेथे मागणी आहे या तुन लाखो रुपयांची कमाई होत आहे
    वेळेवेळी कृषी विभाग परभणी,सेलू चे मार्गदर्शन घेऊन सदरील बाग फुलली आहे पूर्वी सेलू ला आंबे खायचे म्हटले तर परराज्यतून येत असे आता या वर्षी चा आंबा तालुक्यातील च खायला मिळणार आहे शहराचा आंबा अमृतसर हैदराबाद च्या मार्केट मध्ये पोहचला आहे
    फळबागेतुन चांगले उत्पन्न मिळत असल्याने आता शेतकरी वर्ग वळला आहे पाण्याची व्यवस्था निम्न दुधना प्रकल्प व सुपीक जमीन व मुबलक प्रमाणात पाण्याचीउपलब्धता मुळे क्षेत्र वाढले आहे आपल्या मालकीची 1 हेक्टर 20 आर मध्ये आंबा 8 ते 9 टन मालाचे उत्पादन होईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला सर्व खर्च वजा जाता किमान तीन ते चार लाख रुपये निववळ नफा होऊ शकतो उत्पादन खर्च कमी आहे उत्पादन ची खात्री आहे अन्य पिकाच्या तुलनेत फळबाग उपयुक्त आहे असे शेतकरी मेहराज अली नि बोलताना दिली मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात औरंगाबाद येथे आंबा महोत्सव आयोजित घेणार आहे या मध्ये सह भाग घेणार आहेत त्यांना फेसबुक वर 400 ते 500 शेतकरी याना मार्गदर्शन करीत असतात या तालुक्यातील पहिली आमराई फुलल्या मुळे समाधान व्यक्त होत आहे
लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *