सिटझन वेल्फेअर असोशिएशन व कु.ब.न.प.शहरातील विविध विषयांवरील आयोजित केलेली चर्चा यशस्वी —-

————————-                                                             लोकदर्शन बदलापुर 👉(गुरुनाथ तिरपणकर)-

शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्या दालनात सिटीझन वेलफेअर असोशिएशनच्या पदाधिका-यांनी भेट घेऊन चर्चा केली. पावसाळ्यापुर्वी नाले सफाई,मल्टीस्पेशालीटी हाॅस्पिटल,परिवहन सेवा, अग्निशमन यंत्रणा,शव वाहीनी व विद्युत दाहीनी, शहरातील पाणी पुरवठा,स्कायचा वाॅकची दुरुस्ती, फेरीवाले हटाव,सिसिटीव्हीची व्यवस्था अशा विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. काही विशिष्ट विषयांवरील संदर्भात मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी सिटीझन वेलफेअर असोशिएशनलाही काही अधिकार दीलेले आहेत. त्यासंदर्भात सिटीझन वेलफेअर असोशिएशन कु.ब.न.प.ला योग्य ते सहकार्य करणार आहे. बदलापुर शहरातील विविध विषयांवरील आयोजित केलेली चर्चा यशस्वी झाली.या चर्चेत दिलीप नारकर, राजेंद्र नरसाळे,सुहास सावंत, सौ.सुवर्णा इस्वलकर, महेश सावंत,विलास हंकारे यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here