कामगारांना औषधोपचार घेण्यासाठी सर्व सोयींनी युक्त “बांधकाम कामगार हॉस्पिटल” व कामगाराच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी “प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय” सुरू करा.* * जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांची मागणी…

 

लोकदर्शन सांगली👉 राहुल खरात
दि. २५ एप्रिल २०२२

अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळाने सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांची भेट घेतली. यावेळी अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री सो व मा. कामगार मंत्री सो यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे, आम्ही ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य,सांगली जिल्हा यांच्या मार्फत मागणी करीत आहे की, महाराष्ट्रातील बांधकाम कामगार जो सदैव दुसऱ्याच्यासाठी अतोनात कष्ट करतो घाम गाळतो. शहरातील विविध सुशोभिकरण मोठ मोठ्या इमारती, शासकीय
कार्यालये,दवाखाने,शाळा,रस्ते,गटारी,नाले,डॅम,उड्डानपूल असे बरेचसे वास्तु आपल्यासाठी उभे करण्यासाठी देशभरात बांधकाम कामगारांचे मोठे योगदान
आहे. बांधकाम कामगारांची दयनीय अवस्था पाहता त्यांना रोज मिळेल त्या ठिकाणी काम करावे लागते.त्यातून दिवसेंदिवस वाढत चालेली महागाई मुळे जीवन आवश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणाचा अवाढव्य खर्च शैक्षणिक संस्थेचे मनमानी खर्च यातूनच बांधकाम कामगार वर्ग होळपळत आहे.अशा खडतर परिस्थितीत कसेबसे आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत
असतो.अशा या श्रमिक
कष्टकरी उपेक्षित असणाऱ्या कामगारांच्या आरोग्य व शारीरिक वेदनेकडे कोणीच फारसे लक्ष देत नाही.त्या कामगारांची कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. कामगार काम करतो त्याचा मोबदला घेतो असे समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते.बरेच वेळी बांधकाम कामगारांना कामकरते वेळी दुखापत होते परंतु त्यांच्या जवळ पुरेसा पैसा व वेळ नसल्यामुळे होणाऱ्या दुखापत व जखमांच्या कडे कामगार कळत नकळत दुर्लक्ष करत असतो आणि भविष्यात मोठ्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागते,त्यांमुळे कामगारांना वेदनादायक त्रास शेवट पर्यत सहन करावा लागत आहे.तसेच बरेचसे बांधकाम कामगार उंचावर काम करीत असताना खाली पडून गंभीर जखमी झालेले आहेत तसेच काही जणांना वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे कायमचे अंपगत्व प्राप्त झाले आहे. त्यांना असहाय्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. तर काहीजणास मृत्यूला समोर जावे लागले आहे. अशा कठीण परिस्थितीमुळे बांधकाम कामगारांचा संसार उघड्यावर पडत आहे.त्यांच्या नंतर कुटुंबीयाना नरक यातना भोगाव्या लागतात . यांमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा बांधकाम कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबीयाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व सोई सुविधायुक्त असे स्वंतत्र “बांधकाम कामगार हॉस्पिटल” उभारण्यात यावे. तसेच ई.एस.आय.सी. सारख्या योजना लागू करून बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्याचा सर्व प्रकारचे औषध उपचार मोफत करण्यात यावा. तसेच नाका कामगारांच्या आरोग्य तपासणी व औषधे उपचारासाठी फिरता दवाखाना उपलब्ध करून श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांना रोग व वेदना मुक्त करावे. त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या राहणीमान बदलावी व त्यांच्या मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्या मुलांना हक्काचे चागल्या दर्जाचे शिक्षण घेता यावे जेणेकरून भारत देशातील एक मोठ्या दर्जाचा अधिकारी व चांगला नागरिक व्हावा आणि त्या गरीब कष्टकरी बापाचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून,महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई यांच्या कडे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी शिल्लक असणाऱ्या निधी मधून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आधुनिक सोईनियुक्त चागल्या दर्जा चे प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय उभे करून त्यावर कामगारांची शिक्षित व उच्चशिक्षत पत्नी व मुलांना शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी म्हणून सेवा करण्याची संधी द्यावी अशी आम्ही बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या हितासाठी व भवितव्यासाठी विनंती करीत आहोत,तरी आपण आजतागायत कामगारांच्या हिताचे कल्याणकारी निर्णय घेतलेले आहेत हे सुध्दा बांधकाम कामगारांचे व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य व शैक्षणिक घडी सुधारणेच्या दृष्टिकोनातून आपण लवकर निर्माण घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात उपक्रम राबवावा.
त्याचबरोबर श्रमिक कष्टकरी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचा शुभेच्छा घ्याव्यात असे निवेदन देण्यात आले.असे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त मा.अनिल गुरव साहेब यांचे कार्यालयीन अधिकारी सुरेश लोहार सो आणि श्रीकांत मंतनावर सो यांनी स्वीकारले. यावेळी अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय भूपाल कांबळे, जनरल सेक्रेटरी संजय कांबळे, मिरज शहर अध्यक्ष असलम मुल्ला, आटपाडी तालुकाध्यक्ष आबासो काटे,जिल्हा सदस्य बजरंग चंदनशिवे, विक्रांत सादरे, अतिश कांबळे, सिद्धार्थ कांबळे, शिवकुमार वाली, संजय चव्हाण, युवराज कांबळे, सरदार मुल्ला, पंकज सावंत, हिरामण भगत,काशिलिंग सरगर, शरद अमृतसागर, संतोष मोन, महावीर गिरगावकर, प्रवीण लोखंडे, दिपक वेदपाठक, सुभाष पाटील, वसंत भोसले, अनिल अंकलखोपे आदी बांधकाम कामगार उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *