अकरावी प्रवेशाच्या सीईटी साठी सोमवारपासून अर्ज उपलब्ध ! – शिक्षण मंडळाची घोषणा

लोकदर्शन 👉 मोहन भारती
अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेबाबत – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे

*काय म्हणाले दिनकर पाटील ?*

राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीप्रमाणे – या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सोमवार १९ जुलैपासून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध होणार आहेत

या परीक्षेचे नियोजन सध्या अंतिम टप्प्यात आहे – त्यानुसार दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी २३ ऑगस्टपर्यंत स्वतंत्र सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे

यामध्ये राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा विनामूल्य असेल, मात्र अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क आकारण्यात येईल – असे पाटील यांनी सांगितले

*तसे सीईटी परीक्षे बाबत* – आणखी काही अपडेट आले, तर आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू – दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे – आपण इतरांना देखील शेअर करा

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *