बाबासाहेब स्थापित मातृसंघटनाचा प्रचार आणि प्रसार करणे हा काही राजकारणाचा भाग नाही तर धम्मराज्याच्या स्थापनेसाठी आपले अपुर्व योगदान देणे आहे.* *-भंते धम्मानंद, पुणे.                                                 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
*महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या समता सैनिक दल, दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तिन्ही अभिन्न संघटनेचा प्रसार आणि प्रचार करुन या संघटनेचे संरक्षण आणि संवर्धन करणे हा काही राजकारणाचा भाग नाही तर न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या बुद्ध तत्त्वज्ञानाच्या लोकशाही लोकसत्ताक धम्मराज्याच्या स्थापनेसाठी आपले अपुर्व योगदान देणे आहे. ज्यांना भारत हे महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या कारकिर्दीतील सुजलाम सुफलाम भारत निर्माण करायचे असेल त्यांनी आपले अनमोल योगदान देणे, हे बाबासाहेबांच्या अनुयायी, कार्यकर्त्यांचे आद्य कर्तव्य आहे, तसेच दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडियाच्या संविधानातील दहा उद्दिष्टांवर विस्तारपूर्वक मार्गदर्शन केले आणि प्रत्येक अनुयायी, कार्यकर्त्यांनी पंचशीलाचे पालन केल्यास आपले संसारीक जीवन कसे सुखकर हे कथा रुपाने देसना देऊन स्पष्ट केले. आपल्या संघटनशक्तीला समता सैनिक दलाची जोड कायम ठेवल्याने आपल्या समाजावर अन्याय, अत्याचार होणार नाही.असे प्रतिपादन भंते धम्मानंद, पुणे यांनी केले. ते महाबौद्धी बहुउद्देशीय मंडळ, थुटरा त. कोरपना जि. चंद्रपूर येथे दिनांक १८ एप्रिल २०२२ ला धम्म जागृती अभियान द्वारा आयोजित कार्यक्रमात म्हणून बोलत होते.*

*भारतात संविधान बाह्य शक्ती वरचढ होत भारतीय राज्यघटनेला निकामी करण्याचे मनसुबे रचले जात आहे. तसेच दिवसेंदिवस धर्मांधता आणि आणि जातीवाद बोकाळत असताना संविधानाला प्राणप्रिय समजणारी जनता गाजरगवतासारख्या निरर्थक आणि विस्कळीत समाज निर्माण करणाऱ्या संघटना उभ्या करून तुझी संघटना मोठी की माझी संघटना मोठी असा पोरकट खेळ खेळण्यात मशगुल आहे. असे नेते आणि त्यांचे होयबा कार्यकर्ते बाबासाहेबांचे विचार संघटनेचे प्रथम क्रमांकाचे शत्रू आहेत. आपण खरोखरच भारतीय राज्यघटना वाचविण्यासाठी गंभीर असाल तर भारतीय राज्यघटनेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी दिलेल्या बाबासाहेबांच्या १) समता सैनिक दल, २) दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया आणि ३) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संविधानीक संघटना वाचविण्यासाठीच आपले योगदान दिले पाहिजे, मनोगत बाबासाहेबांच्या संघटनेचे प्रचारक अशोककुमार उमरे यांनी व्यक्त केले.*

*भंते धम्मानंद, पुणे आणि अशोककुमार उमरे यांनी गावात आल्यावर गावातील उपासक सहकाऱ्या समवेत घरोघरी भेट देऊन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमांसाठी मुबलक प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमांची सुरूवात तथागत बुद्ध आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुजा पाठ व वंदनेने आणि समारोप सरणतयने करण्यात आला.*

*कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगदीश धवने, ्नितेश रामटेके, विजय चुनारकर, गोविंदा इंगोले, प्रविण नरवाडे, मधुकर तावाडे, राजेंद्र चुनारकर, युवराज चुनारकर, संदीप वाघमारे, दिनेश गायकवाड व आयुष्मती गायकवाड हरदोना, बबिता तावाडे, प्रशांत चुनारकर, सुजल चुनारकर, प्रयास रामटेके, सिमाताई चुनारकर, स्नेहल रामटेके, अर्चना रामटेके, मिरा दहाडे, कविता वाकडे, लक्ष्मीबाई इंगोले, वैशाली चुनारकर, जयशीला नरवाडे, रत्नमाला चुनारकर, रिथा चुनारकर, संध्या चुनारकर, प्राजक्ता दहाडे इत्यादींनी एकजुटीने पुढाकार घेऊन योगदान दिले.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *