!! गडचांदूर शहरात मोठ्या उत्साहात राम नवमी शोभा यात्रा सम्पन्न!!                                                             

लोकदर्शन 👉 मोहन भारती


,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
⭕!! महिलांच्या हीरव्या कलरची साडी व भगवा फेटा मुळे शोभा यात्रेला आकर्षण!!
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

गडचांदूर —
गडचांदूर शहरात राम प्रभू श्रीराम जन्म उत्सव ( रामनवमी) मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.सर्व प्रथम हनुमान मंदिर ( राम मंदिर) समितीचे वतीने दुपारी 12.०० वाजता राम जन्मो उत्सव साजरा करण्यात आला.त्यानंतर श्रीराम जन्म शोभायात्रा उत्सव समितीचे वतीने सर्वप्रथम महिलांची मुख्य रस्त्याने स्कुटी ची रॅली काढण्यात आली.व त्यानंतर वॉर्ड न तीन येथील राम मंदिरात (हनुमान मंदिर) येथे एकत्र गोळा झाले.व लगेच प्रभू रामजी चे पूजन करून ढोलताश्यात ,भजन सह भव्य शोभा यात्रा शहरातील हनुमान मंदिर ते शेडमाके चौक,ते संविधान चौक,महात्मा गांधी चौकातून काढण्यात आली.व अचानक चौकात दुर्गा मंदिरात समारोप करण्यात आली.विशेष म्हणजे या शोभायात्रा मध्ये मोठ्या संख्येत वयोवृद्ध,महिला,पुरुष,मुलांनी उपस्थिती दर्शविली तर महिलांनी वेशभूषा , फेटे बांधून स्कुटी ची आकर्षित रॅली काढण्यात आली.शोभायात्रेत रथावर विराजमान राम, लक्ष्मण, सीता,हनुमान यांच्या वेशभूषेतील बालके सर्वांचे लक्ष वेधून घेत होते,यावेळी हनुमान मंदिर समितीचे राम जन्मोत्सव समितीचे सदस्य बळवंत मामा शिंगाडे ,भाक्तूजी सातपाडी, भाऊराव खामणकर, मनोज भोजेकर ,धनंजय गोरे,तानाजी बुऱ्हाण, शिवकुमार राठी, केशव डोहे अशोक गोरे होते.प्रभू श्रीराम नवमी शोभा यात्रा समितीचे सतिश उपलेंचवार ,निलेश ताजने,अरविंद डोहे,, प्रतीक सदनपवार,सातफळी, संदीप शेरकी,हरिभाऊ घोरे,तुळशीराम पानघाटे, शरद जोगी, राकेश अरोरा,महादेव एकरे, शिवाजी शेलोकर ,पवन राजूरकर,,कमलेश डांगे,बंटी गुरनुले,तुषार देवकर राहुल चुरे,हरी कुसळे, पंकज ई टनकर अजीम बेग,सोनू मेश्राम,नंदू कुसळे, सौ विजयालक्ष्मी डोहे,अपर्णा उपलेंचवार,सौ सपना शेलोकर,सौ मंथनवार,सौ गोरे,,सौ एकरे,सौ मायाताई सुरपाम, सौ कल्पना जोगी व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *