तत्वनिष्ठतेमुळेच भाजपाला मोठा जनाधार* *भाजपा प्रखर राष्ट्रभक्तांचा पक्ष* *भाजपा स्थापनादिनी हंसराज अहीर यांचे प्रतिपादन

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


चंद्रपूर – भाजपा हा देशातील सर्वात शक्तीशाली पक्ष म्हणुन उदयास का आला? याचे कारण हेच की, जनसंघापासून ते भाजप प्रवासापर्यंत पक्षाने आपल्या तत्वांशी, निष्ठांशी कधीच समझोता केला नाही. या तत्वनिष्ठतेमुळेच भाजपाने असंख्य प्रखर राष्ट्रभक्त कार्यकर्ते घडवीले आहेत. राष्ट्रभक्तीची बीजे रूजलेल्या या पक्षाने पक्षस्थापन करतांना जे ध्येय बाळगले होते त्याची पुर्तता सत्तेत आल्याबरोबर करून दाखविली. मग ते 370, 35 अ कलम असो की, राममंदीर पुनर्निमाणाचा निर्धार असो, नाॅर्थ ईस्टचा उग्रवाद, कश्मीरचा आतंकवाद, नक्षल कारवायांवर प्रतिबंध, भयमुक्त समाज, सुरक्षीत सिमा, सुरक्षीत भारत ही संकल्पना साकार केली हे भाजपप्रणीत सरकारचे मोठे यश असून लोकांचा विश्वास या पक्षाने सार्थ ठरविला आहे. जनतेनी ते अनुभवले म्हणुनच आज भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. पक्षाचा जनाधार या विश्वासानेच वाढला असल्याचे प्रतिपादन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी भाजपा स्थापना दिनाच्या वर्धापन सोहळ्यास उपस्थित कार्यकत्र्यांना संबोधीत करतांना केले.
दि. 06 एप्रिल रोजी स्थानिक गांधी चैक येथे भाजपाव्दारा आयोजित या कार्यक्रमास लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा पूर्व वित्तमंत्राी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेशचंद्र बागला, राज्य वनविकास महामंडळाचे पूर्व अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, ज्येष्ठ नेते विजय राऊत, मोहन घरोटे, ज्येष्ठ महिला कार्यकत्र्या श्रीमती ठक्कर, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर राखीताई कंचर्लावार, माजी महापौर अंजली घोटेकर, महानगर जिल्हाध्यक्ष डाॅ. मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभपती संदीप आवारी, भाजयुमोचे विशाल निंबाळकर आदी प्रभ्रूतींची विशेष उपस्थिती होती.
आपल्या मार्गदर्शनात हंसराज अहीर यांनी डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या ‘‘एक निशान, एक विधान, एक प्रधान’’ या वचनाचे स्मरण करून देत माननिय प्रधानमंत्राी नरेंद्र मोदीजींच्या सरकारने देशवासीयांचे हे स्वप्न पूर्ण केले असल्याचे सांगीतले. आज भाजपाने कश्मीर ते कन्याकुमारी ते केरळ पर्यंत पक्षाचा प्रभाव वाढविला आहे. याचे कारण काॅंग्रेस व अन्य पक्षाच्या नेत्यांनी आपल्या मुळ ध्येय व तत्वांपासून फारकत घेतल्याने हे पक्ष तळास गेले व भाजपा शिखरावर पोहोचली अशा प्रखर देशभक्त पक्षाच्या पाठीशी जनता उभी राहील, जनतेने भाजपाला आशीर्वाद द्यावा असे आवाहन करून अहीर यांनी मोदींच्या कणखर नेतृत्वाने चीन आणि पाकीस्तान या देशाला खरी जागा दाखविली आहे. युक्रेन युध्दात 20 हजाराहून अधिक भारतीय विद्यार्थी व लोकांना मायदेशी सुरक्षीत आणले ही भाजपा सरकारची यशस्वी गाथा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.
जिल्ह्यात भाजपाच्या उत्कर्षासाठी अॅड. दादासाहेब देशकर, रमेशजी बागला, शोभाताई फडणवीस, चंदनसिंह चंदेल, विजय राऊत यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या नेतृत्वात आमच्यासारख्या कार्यकत्र्यांना पक्ष संघटनेत कार्य करण्याची संधी लाभली हे आम्हासाठी अहोभाग्याची गोष्ट असल्याचेही हंसराज अहीर यांनी यावेळी सांगीतले. कार्यकत्र्यांच्या अविश्रांत परीश्रमातून जिल्ह्यात भाजपाचा दबदबा असल्याचेही ते म्हणाले. यावेळी हंसराज अहीर, सुधीर मुनगंटीवार व अन्य पदाधीकाÚयांच्या शुभहस्ते रमेशजी बागला, चंद्रनसिंह चंदेल, विजय राऊत यांचेसह अनेक ज्येष्ठ कार्यकत्र्यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास अनेक मान्यवर वक्त्यांची समयोचित भाषणे झालीत. या स्थापना दिन सोहळ्यास भाजपा पदाधिकारी व कार्यकत्र्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *