“पोषण पंधरवाडा निमित्त पवनी येथे महारॅलीचे आयोजन”.

लोकदर्शन पवनी/भंडारा दि.४एप्रिल(-जिल्हा प्रतिनिधी 👉अशोक गिरी)

एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्प भंडारा व पवनी बिट यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२१मार्च ते ४एप्रिल या कालावधीत पोषण पंधरवाडा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे उद् घाटन आरोग्य सेविका संपदा तलवारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरीकांचे रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यासाठी एक दिवसीय विशेष शिबिरांचे आयोजन देखील करण्यात आले होते.यावेळी उपस्थित लाभार्थी यांना वजन,उंची तथा सकस आहार याविषयी सविस्तर आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.त्यानंतर शहरातील मुख्य मार्गाने महारॅली काढण्यात आली.यामध्ये महाराष्ट्रीयन शेतकरी आणि पोषण आहार यांच्या वर पोषण थीम तयार करून पारंपरिक पद्धतीने आहाराची प्रदर्शनी दाखविली गेली त्या रॅली मध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्प भंडारा येथील मुख्य सेविका योगिता पद्मशाली यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.सदर महारॅली शहरातील विशेष आकर्षण ठरली त्यामुळे अधिक प्रमाणात जनजागृती निर्माण झाली.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आरोग्य सेविका रामटेके,गौतमी मंडपे,अनिता घोडिचोरे,मंगला लोखंडे,रुपलता वंजारी,भारती काटेखाये,अश्विनी खांदाडे, रंजना रायपूरकर,शिला कांबळे,पुष्पा सुतारे,शभांगी दडवे,सविता गणवीर,विजुमाला साखरकर,पुष्पलता घाटोळकर,आशा अवसरे,कविता बावनकर तथा समस्त केंद्रातील सेविका आणि मदतनीस यांनी अथक परीश्नम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *