“मराठा इतिहास रचतो,” महाराष्ट्राशी नाळ जोडलेल्या नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरेंचा फोन

लोकदर्शन 👉 मोहन भारती

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा आणि सोबतच बक्षिसांचा वर्षाव होत आहे. सध्या संपूर्ण देशाला नीरज चोप्रा मायदेशी कधी परतणार याची आस लागली आहे. नीरज चोप्राच्या हरियाणातील गावातही सध्या उत्साहाचं वातावरण असून दिवाळी साजरी केली जात आहे. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला असून सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कुटुंबाने एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली.

हरियाणातील खांदरा हे नीरज चोप्राचं मूळ गाव आहे. उद्धव ठाकरेंनी पीएमार्फत नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नीरज चोप्राचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी वेळ मागितली असून विधानसभेत बोलावून सन्मानित केलं जाणार आहे. मुंबईत त्याचं भव्य स्वागत होणार आहे अशी माहिती कुटुंबातील सदस्याने दिली. दरम्यान यावेळी त्यांनी “मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो” असंही उद्धव ठाकरे म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं.

ऑलिम्पिकचा ‘गोल्डन बॉय’ नीरज मराठ्यांचा वंशज; पूर्वज लढले होते पानिपतच्या युद्धात

१३ ऑगस्टला नीरज चोप्रा आपल्या गावात येणार आहे. यावेळी इतिहासात आजवर झालं नाही असं सेलिब्रेशन करणार असल्याचं कुटुंबाने म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी आपलं मराठी कनेक्शनही सांगितलं. नीरज चोप्राच्या विजयानंतर संभाजीनगरमध्ये फटाके वाजवण्यात आले सांगत त्यांनी अभिमान व्यक्त केला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *