भव्य मोफत नेत्रचिकित्सा, चष्मे वाटप व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

0
108

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि आपल्या सर्वांचे लाडके मा. आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष मा. देवरावदादा भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शुक्रवार 30 जुलैला प्रयास सभागृह, केमिकल नगर, घुघुस येथे भव्य मोफत नेत्रचिकित्सा, वाटप व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.
या शिबिरात डॉक्टरांमार्फत डोळे तपासणी करून, चष्मा लागेल त्यांना मोफत चष्म्याचे वितरण, मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करून देण्यात येणार आहे.
तरी आपणास विनंती आहे की आपण गरजू रुग्णांपर्यंत हि माहिती पोहचवावी. पण त्यांना सोबत घेऊन येण्याची कृपा करावी.
हा कार्यक्रम कोविडच्या नियमांचे पालन करून घेण्यात येणार असल्यामुळे सकाळी ठीक 11 वाजता येऊन नोंदणी करावी.

दिनांक : शुक्रवार 30 जुलै 2021
स्थळ : प्रयास सभाग्रह केमिकल नगर घुघुस
वेळ : सकाळी 11 वाजता

अधिक माहितीसाठी मा.आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here