*शिवनगर वसाहतीच्या जवळील कचरा डेपो तात्काळ हटवा*

0
47

 

*भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे यांचा संघर्षाचा इशारा*

एक आठवड्यापासून शिवनगर वसाहतीच्या जवळ घुग्घुस परिसरातील घाण कचरा घुग्घुस नगर परिषदे तर्फे शिवनगर येथे डेपो बनवून त्यात टाकण्यात येत आहे.त्यामुळे शिवनगर वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्राससहन करावा लागत आहे. या समस्येची स्थानिकांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या कडे दाद मागितली.

दादांच्या सुचनेनुसार भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे यांनी शिवनगर वासियांना सोबत घेऊन घुग्घुस नगर परिषद कार्यालयात जाऊन, प्रशासक निलेश गौड यांची भेट घेतली व चर्चा करून निवेदन दिले. घुग्घुस येथील शिवनगर वसाहतीच्या जवळील कचरा डेपो हटविण्यात यावा अशी मागणी केली.

यावेळी भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे म्हणाले शिवनगर वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वसाहतीच्या जवळ भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयीजींच्या नावाने सुंदर बगीचा बनविण्यात आला आहे. त्याला लागून बिलीवर्स चर्च आहे. जवळच डेपोत घाण कचरा टाकून दूषित करण्यात येते आहे. त्यामुळे या कचऱ्याच्या डेपोची विल्हेवाट इतरत्र घुग्घुस नगर परिषदेने करावी, अन्यथा संघर्ष करण्यात येईल असे ते म्हणाले.

यावेळी लक्ष्मण कटकम, विशाल दामेर, मूर्ती पेरपुल्ला,सुरज जागेट, रोहित तकल्ला, अमित दासरी, सन्नी थोगर, रोहन तकल्ला, सागर तोकलवार, मनीष मुळे, राजेश येनगद्दलवार, दिलीप कैथल, साहिल तगल्लपेल्ली,प्रीतम डोंगरे, अंकित निचकोला, रितिक लंका तथा अनेक शिवनगर रहावासी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here