अमलनाला पर्यटन स्थळ येथे सौंदर्यीकरणसोबतच पक्षी निरीक्षण केंद्र तयार करा वी कैन फाउंडेशनची आमदार सुभाष धोटे कड़े मागणी

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदुर-
अमलनाला पर्यटन केंद्राचे सौंदर्यीकरण होणार आहे
सुसज्ज आणि विविध सोयीसुविधा युक्त पर्यटन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती आहे.
अमलनाला हे पर्यटकासाठि आकर्षक असे ठिकाण आहे, याठिकाणी अनेक पक्षी देखील मोठ्याप्रमाणात संचार करतात . ‘पक्षी हा पर्यावरणातील महत्त्वपूर्ण घटक असून, पर्यावरण संतुलनामध्ये त्याची भूमिका महत्त्वाची असते.

अमलनाला येथे सौंदर्यीकरणसोबतच पक्षी निरीक्षण केंद्र तयार करण्यात यावे अशी मागणी पर्यावरण प्रेमी संघटना वी कैन फाउंडेशन, गड़चांदुरच्या वतीने गटनेते नगरसेवक विक्रम येरणे, अरविंद मेश्राम यांच्या मार्फत आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या कड़े निवेदनातून केली आहे ,

● अमलनाला या ठिकाणी विविध दुर्मिळ पक्षाच्या नोंदी झाल्या आहेत , दरवर्षी परदेशी पक्षी याठिकाणी हजेरी लावतात , पक्षी निरीक्षण केंद्र झाल्यास पक्षीनिरीक्षणसाठि जिल्ह्यात आकर्षक असे केंद्र ठरेल.
निसर्गरम्य वातावरनात पक्षीवैभवाचे निवांत निरीक्षण करण्यासाठी उत्कृष्ट होईल आणि
बाहेरुन येणाऱ्या पक्षीनिरीक्षकाची संख्या वाढेल,
जिल्यात पक्षी निरीक्षणसाठि आकर्षक असे केंद्र ठरेल. असे मत पर्यावरण प्रेमी कडून व्यक्त केले जात आहे .

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *