गोंडपिपरी तालुक्यातील साऱ्याच निवडणुका ताकतीने लढवू:संदीप करपे*

0
78

 

*शिवसंपर्क अभियाना दरम्यान जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती*

*शिवसंपर्क अभियानाला घडोलीतून सुरवात*

गोंडपिपरि-

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे महाराष्ट्रासह संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेल्या शिवसंपर्क अभियान व पक्ष संघटन मजबुतिकरणाच्या दृष्टीने आज गोंडपिपरि दौऱ्यावर होते.दरम्यान आज शिवसंपर्क अभियानाची सुरवात घडोलीपासून करण्यात आली.यावेळी उपस्थितांना तालुका प्रमुख सुरज माडुरवार,बबन उरकुडे यांनी मार्गदर्शन केले.उपस्थितांनी जिल्हाधक्षांसमोर समाशांचा पाढा वाचला.यावेळी संदीप गिर्हे यांनी दोन दिवसात समशा सोडवण्याचे आश्वासन दिले.नागरिकांनी देखील संपूर्ण गाव शिवसेनेच्या पाठीशी राहील असा विश्वास व्यक्त केला.यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप गिरहे,जिल्हा उपप्रमुख संदीप करपे,बबन उरकुडे,तालुका प्रमुख सुरज माडुरवार,सुजित पिंपळशेंडे,ठाकूर,बबु पठाण,नरेंद्र इंगोले,आनंदराव गेडाम,विवेक राणा,नायडू,बळवंत भोयर,राहुल मेकर्तीवर,केतन भोयर, रुपेश राऊत ,पुरुषोत्तम राऊत ,पंकज जांबोर आशिष चरडे ,अमित मारशेट्टीवर ,सुरज भोयर,ऋतिक कोकोडे, नितेश राऊत ,मनोज जुंघरे,निकेश,प्रफुल्ल तेलसे ,संदीप मेकर्तिवर उपस्थित होते.उपजिल्हाप्रमुख संदीप करपे यांनी सर्व समशा जानून घेऊन सोडवणार असल्याची खात्री दिली.येणाऱ्या दिवसात सर्व निवडणुका ताकतीने लढवण्याचा मानस व्यक्त केला.जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी पक्षसंघटना बळकट करण्याचे आव्हाहन कार्यर्त्यांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here