सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारोती एकरे यांना निरोप तथा सत्कार समारंभ

0
113

By : Mohan Bharti

गडचांदूर : गडचांदूर सावित्रीबाई फुले विद्यालय तथा क. महाविद्यालय गडचांदूर चे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मारोती एकरे हे नियत वयो मानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त शाळेतील शिक्षक, प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना निरोप तथा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनियुक्त प्राचार्य तथा मुख्याध्यापक धनंजय काळे होते.तर प्रमुख अतिथी सत्कारमूर्ती मारोती एकरे बी.एस उलमाले, प्रा.प्रदीप वांढरे, उपस्थित होते. याप्रसंगी श्री. एकरे यांनी आपल्या सेवेचा मागोवा मनोगतातून सांगितला. याप्रसंगी शाळेतील जेष्ठ शिक्षक बी.एस उल्मले यांची संजय गांधी विद्यालय, की.महाविद्यालय, पेललोरा येथे मुख्याध्यापक म्हणून बदली झाली.  त्यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार  व निरोप देण्यात आला. याप्रसंगी श्री.बावनकर, प्रा.झाडे, ज्योती चटप, सीताराम पिंपळशेंडे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व कर्मचाऱ्यांनी एकरे व उलमाले यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन महेंद्रकुमार ताकसांडे यांनी तर आभार भुवनेश्वरी गोपमवर यांनी मानले. कार्यक्रमाचे शाळेतील शिक्षक, प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here