महात्मा गांधी विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय ,गडचांदूर चे प्राचार्य कृष्णा बततुलवार सेवानिवृत्त ,, भावपूर्ण सत्कार,,

0
128

By : Mohan Bharti
गडचांदूर :- महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय,गडचांदूर या नामवंत शाळेचे मुख्याध्यापक श्री कृष्णा बत्त्तुलवार नियत वयोमानानुसार प्रदीर्घ सेवेनंतर 30 जून ला सेवानिवृत्त झाले त्या निमित्ताने निरोप व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानि . गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ , गडचांदूर चे संचालक तथा गोंडवाना विद्यापीठ , गडचिरोली चे प्रभारी कुलसचिव तथा संचालक परीक्षा नियंत्रक डॉ, अनिलराव चिताडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार ऍड, विठ्ठलरावजी धोटे , संस्थेचे प्रभारी सचिव श्री. धनंजय गोरे ,संस्थेचे जेष्ठ संचालक श्री. विठ्ठलराव थिपे , संचालक श्री. विकास भोजेकर, श्री रामचंद्र पाटील सोनपितरे,संचालिका श्रीमती. उज्वलाताई धोटे , सौ .प्रतिभाताई धोटे ,सत्कार मूर्ती सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.कृष्णा बत्त्तुलवार उपमुख्याध्यापिका प्रा,सौ. स्मिता चिताडे ,पर्यवेक्षिका श्रीमती. शोभा घोडे, उपप्राचार्य श्री विजय आकनूरवार होते,
याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृष्णा बततुलवार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,
उपस्थित अतिथीनि कृष्णा बततुलवार यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या, बततुलवर यांनी सत्काराला उत्तम देताना संस्थेबदल कृतज्ञता व्यक्त केली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा घोडे यांनी केले,संचालन एच.बी.मस्की यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री प्रशांत धाबेकर यांनी केले.कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here