महाराष्ट्राच्या जडणघडणीत वसंतराव नाईकांचे अमुल्य योगदान. — आमदार सुभाष धोटे.

 

पंचायत समिती राजुरा येथे कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन.

राजुरा :– १ जुलै २०२१

By : Mohan Bharti
पंचायत समिती राजुरा येथे कृषीक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले महाराष्ट्राला यशोशिखरावर पोहचविण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले आहेत. महाराष्ट्राच्या या जडणघडणीत महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे अमुल्य योगदान राहिले आहे. त्यांनी आपल्या राज्याला खऱ्या अर्थाने सुजलाम, सुफलाम केले आहे. ते महात्मा फुलेंच्या विचाराने प्रेरित होते. कृषी क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले. त्यामुळेच राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. चीन, जपान, सिंगापूर, श्रीलंका येथे दौरे करून शेतीपिकांच्या संकरित वाणांची महाराष्ट्राला ओळख करून दिली. त्यांच्या प्रयत्नाने कापूस हे नगदी पीक शेतकऱ्यांच्या हाती आले. त्यांनी सहकारी उद्योगाचे जाळे उभे केले. त्यांनी राज्यत पंचायतराज कायद्याची मुहूर्तमेढ रोवून सत्तेचे विकेंद्रीकरण केले, दुध डेअरी, रोजगार हमी योजना यशस्वीपणे राबविली आणि विकास गंगा खेड्यापाड्यांत पोहचवली.
या प्रसंगी राजुरा तालुक्यातील रब्बी हंगामातील हरभरा उत्पादक पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त शेतकऱ्यांचा आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात शंकर बोढे, दशरथ भोयर, मधुकर धानोरकर या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सभापती मुमताज जाविद अब्दुल, जि प सभापती सुनील उरकुडे, जि प सदस्य मेघाताई नलगे, प स उपसभापती मंगेश गुरणुले, प स सदस्य तुकाराम मानुसमारे, उपविभागीय कृषी अधिकारी जी. डी. मोरे, गटविकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत, तालुका कृषी अधिकारी व्ही. के. मकपल्ले, कृषी अधिकारी डाखरे, कृषी विस्तार अधिकारी पोहोकर, विकास देवाळकर, अरुण सोमलकर यासह शेतकरी उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *