

लोकदर्शन
एखाद्या व्यक्तीवर श्रद्धांजलीपर लेख हे सर्वच लेखक,पत्रकार लिहीत असतात, मात्र एखादे संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडले आणि त्यांचेवर श्रद्धांजली लेख लिहिण्याचा दुर्दैवी प्रसंग कुणाच्याच आयुष्यात येत नाही.पण करोनाने हा प्रसंग आता बहुतेक लेखक आणि पत्रकार यांचेवर आणला आहे.आज मी पहिल्यांदाच अशाच एका लढवय्या कुटूंबावर दुर्दैवाने श्रद्धांजली अर्पण करीत आहे.आंबेडकरी चळवळ अलीकडच्या काळात गतिमान करतानाच संविधानाची अभ्यासपूर्ण मांडणी करून संविधानासाठी गेली कित्येक वर्ष लढा देणारे,समाजक्रांती आघाडीच्या माध्यमातून वंचित,भूमिहीन लोकांसाठी अहोरात्र झटणारे,प्रसंगी कारागृहात जाणारे प्रा.मुकुंद खैरे आज करोना शी लढताना हरले.5 मे रोजी त्यांचे निधन झाले. गेल्या 10 दिवसात खैरे कुटुंब कोरोनाच्या विळख्यात गेले. खैरे सरांच्या पत्नी 10 दिवसांपूर्वी मरण पावल्या.हा धक्का सहन करण्याची ताकद येण्यापूर्वीच त्यांची मुलगी शताब्दी तीन दिवसांपूर्वी गतप्राण झाली.याचा ठावठिकाणा नसतानाच आज खैरे सर आपल्याला सोडून गेले.
6 डिसेंबर 1991 रोजी प्रा. खैरे यांनी समाजक्रांती आघाडीची स्थापना केली.समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याची जबाबदारी त्यांनी या संघटनेच्या माध्यमातून स्वीकारली. ते समाजशास्त्र या विषयाचे व्याख्याता. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे ते कार्यरत होते.त्यांनी संविधानाचा अभ्यास केला.आणि त्यानंतर त्यांचा संविधानासंदर्भातील जनजागृती चा कार्यक्रम सुरू झाला.बुध्दगया मुक्ती आदोलन,सविधान रिवु कमीशन बसले होते तेव्हा चिप जस्टिस वकेट चलया यांना 5०० प्रश्नावली भरुन भारत सरकारला सादर करणे,आदिवासी समाजल मेळघाट येथे जमीनीचे पंट्टे मिळवुन दिले.या करीता ते कारागृहा गेले.बौद्ध धम्मा साठी स्वंतत्र कायदा असावा याकरीता सुप्रीम कोर्टात याचीका दाखल केली.
चंद्रपुरात त्यांचे काम मोठया प्रमाणावर सुरू होते.स्व. गुरुदास कांबळे गुरुजी व त्यांचे सहकारी खैरे सरांचे खास कार्यकर्ते होते.त्यामुळेच मी 2003-4 या वर्षी राहूल कांबळे यांचे समवेत दोन तीनदा खैरे सर यांच्या सभा पत्रकार म्हणून कव्हर केल्यात.त्यांच्या सविधानाबद्दलचा गाढा अभ्यास अनुभवता आला.कांबळे परिवार आणि खैरे सर यांचा ऋणानुबंध कायम होता.बाबुपेठ परिसरातील बहुसंख्य कार्यकर्ते खैरे सरांवर नितांत प्रेम करायचे.
आंबेडकरी चळवळ गतिमान करून बौद्ध धर्माला स्वतंत्र कायदा असावा ही त्यांची तळमळ होती मात्र करोनाने या लढवय्या नेत्याला हिरावून नेले.खैरे सरांचे संपुर्ण कुटुंब या करोनाने हिरावून नेल्याने समाजाची विपरीत हानी झाली आहे. या लढवय्या कुटुंबाला भावपूर्ण श्रद्धांजली.
अरविंद खोब्रागडे, चंद्रपूर
5 मे 2021