

लोकदर्शन 👉
कोरपना येथुन जवळच असलेल्या पिपरी येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल उर्फ प्रफुल चांदेकर याला एका महिलेच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली. त्रास असह्य झालेल्या महिलेने कोरपना पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली.
अनिल उर्फ प्रफुल चांदेकर हा पिपरी येथे राहात असुन तो तंटामुक्त समितीचा अध्यक्ष आहे. पिपरी येथुन जवळच असलेल्या एका गावातील महिलेशी ओळख झाली. तीच्या घरी येणे जाणे सुरु झाले. रात्रीबेरात्री तिच्या घरी जाणे व तीला धमकावून अश्लील बोलुन शिवीगाळ करणे असे काही दिवसापासुन सुरु होते. आपलीच बदनामी होईल व आपल्या जिवीताला धोका होवु शकतो याच उद्देशाने ती गप्प होती. मात्र तक्रारी च्या एक दिवसा अगोदर तो घरी आला आणि वाईट नजरेने पाहुन अश्लील शब्द वापरुन धमकी दिली त्यामुळे घाबरून ती महिला घरा बाहेर पडुन सरळ कोरपना पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून कोरपना चे ठाणेदार अरुण गुरनुले यांनी अनिल चांदेकर याच्या विरोधात 450, 354 (ड) (1),294,506,66 या कलमा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. व अनिल याला अटक करण्यात आली.चार मे ला राजुरा न्यायालयात हजर केले व न्यायालयानी एक दिवसाचा पिसिआर दिला आज त्याची रवानगी चंद्रपुर कारागृहात करण्यात आली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अरुण गुरनुले करीत आहे.