बीएएमएस वैदयकीय अधिका-यांना कार्यमुक्‍त करण्‍याचा निर्णय मागे घेत सुधारित शासन निर्णय निर्गमित करणार

लोकदर्शन 👉 by shivaji selokar
*ना. राजेश टोपे यांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांना आश्‍वासन*

राज्‍यभरातील प्राथमिक आरोग्‍य केंद्रामध्‍ये ज्‍या बीएएमएस शिक्षीत वैदयकीय अधिका-यांनी गेल्‍या दोन वर्षापासुन रूग्‍णसेवा केली त्‍या 835 डॉक्‍टरांना कार्यमुक्‍त करण्‍याचा निर्णय अन्‍यायकारक आहे. या डॉक्‍टरांना कोरोना काळात केलेली सेवा व दिलेले योगदान लक्षात न घेता त्‍यांच्‍या सेवा संपविण्‍याचा घेण्‍यात आलेला हा निर्णय त्‍वरीत मागे घेण्‍यात यावा, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सार्वजनिक आरोग्‍य मंत्री राजेश टोपे यांचेकडे केली. हा निर्णय त्‍वरीत मागे घेण्‍यात येईल व सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्‍यात येईल असे आश्‍वासन ना. राजेश टोपे यांनी आ. मुनगंटीवार यांना दिले.

बीएएमएस वैदयकीय अधिका-यांनी आपली मागणी आ. मुनगंटीवार यांना अवगत केली. आ. मुनगंटीवार यांनी त्‍वरीत दिनांक ५ मे रोजी बीएएमएस शिक्षीत वैदयकीय अधिका-यांशी झुमद्वारे ऑनलाईन संवाद साधला व त्‍यांच्‍या प्रश्‍न जाणुन घेतले. त्‍यानंतर आ. मुनगंटीवार यांनी दुरध्‍वनीद्वारे सार्वजनिक आरोग्‍य मंत्री राजेश टोपे यांच्‍या संपर्क साधुन चर्चा केली. या वैदयकीय अधिका-यांनी आपल्‍या जिवाची पर्वा न करता कोरोना काळात रूग्‍णसेवा केलेली आहे. सेवासमाप्‍तीच्‍या निर्णयामुळे त्‍यांच्‍यासमोर बेरोजगारीचे सावट उभे ठाकले आहे. हा निर्णय त्‍वरीत मागे घेण्‍यात यावा त्‍याचप्रमाणे त्‍यांच्‍या वेतनात सुध्‍दा वाढ करण्‍यात यावी अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली. हा निर्णय त्‍वरीत मागे घेण्‍यात येईल व सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्‍यात येईल असे आश्‍वासन ना. राजेश टोपे यांनी दिले.

या बैठकीला डॉ. अक्षय जव्‍हेरी, डॉ. योगेश देवतळे, डॉ. करिश्‍मा येडे, डॉ. स्‍वप्‍नील हिवराळे, डॉ. क्षितीज झाडे, डॉ. विकास राठोड, डॉ. अमोल राठोड, डॉ. अश्विनी भोयर, डॉ. विशाखा नक्षणे, डॉ. श्रीनिवास गावंडे, डॉ. गंधे, डॉ. अपर्णा झाडे, डॉ. आशिष अग्रवाल, डॉ. अंजली ल्‍हाते, डॉ. शुभम भरते, डॉ. मनिषा खंडारे, डॉ. विदया चोरे, डॉ. वैशाली ठाकरे, डॉ. ओम ठाकुर, डॉ. स्‍वाती मारवल, डॉ. आकाश खडेकार, डॉ. सचिन पांडव, डॉ. शोयब शेख्, डॉ. खेमा खेर्डे, डॉ. प्रियंका नकाला, डॉ. अनामिका चंद्रगिरीवार, डॉ. चैताली कवळे, डॉ. जतीन लेंगुरे, डॉ. जयश्री भोगांडे, डॉ. प्रणित प्रागीवार यांची उपस्थिती होती.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *