*अजून किती लाटा येतील ते सांगू शकत नाही – तात्याराव लहाने*

0
343

मुंबई: ” by ÷ shivaji selokar साथ रोगामध्ये सतत व्हायरसची वाढ होत असते. अजून किती लाटा येतील ते आज सांगू शकत नाही. पण कितीही लाटा आल्या तरी महाराष्ट्राची तयारी आहे. आपण सक्षम आहोत. कोरोना विरोधात लढण्यासाठी आपण सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत” असे वैद्यकीय शिक्षण संचालनलयाचे संचालक तात्याराव लहाने म्हणाले.

“सातलाखापर्यंत रुग्ण संख्या वाढली पण त्यासाठी महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजन, बेड्स आणि व्हेटिंलेटर या सगळ्याची चांगली व्यवस्था केली आहे” असे तात्याराव लहाने यांनी सांगितले.कोरोनाचे आकडे लपवण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “कोरोना रुग्णांचे आकडे लपवायचे नाहीत, असे आम्हाला सक्त आदेश आहेत. एखाद्या व्यक्तीचे अपघातात निधन झाले आणि ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल, तर आम्ही कोरोना मृत्यू म्हणून दाखवतो. कुठलीही लपवाछपवी करत नाही” असे तात्याराव लहान म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here